June 30, 2024 7:58 PM

राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा : महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराजीला सुवर्णपदक

राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योती याराजी हिनं आज महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं. हरयाणामधे पंचकुला इथं झालेल्या या स्पर्धेत ज्योतीनं १३ मिनिटं ६ सेकंदांत अंतर पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा स्पर्धेत तेजस शिर्से याने १३ मिनिटे ५४ सेकेंदांत अंतर प...

June 30, 2024 7:53 PM

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चरित्रासह दोन पुस्तकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चरित्रासह दोन पुस्तकांचं प्रकाशन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नायडू यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त दूरचित्रसंवाद माध्यमातून मोदी यांनी पुस्तकांचं प्रकाशन केलं. या पुस्तकांमुळे त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेकांना देशकार्य करण्यासाठी प्रे...

June 30, 2024 7:48 PM

मविआ आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढतील – शरद पवार

महाविकास आघाडीतले घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बदल होण्याची गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी विरोधी आघाडीवर आहे, असं ते म्हणाले. जागावाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही, ...

June 30, 2024 7:19 PM

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : महिला दुहेरीत भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान

ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत दिया पराग चितळे आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत जपानच्या साकुरा योकोई आणि सात्सुकी ओडो या जोडीनं त्यांचा ३ - ० असा पराभव केला.

June 30, 2024 8:25 PM

नव्या फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे परिषद

ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्यांच्या जागी भारतीय यंत्रणेने तयार केलेले नवे, कालसुसंगत कायदे आणण्याची गरज कायदेविषयक तज्ञांनी आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आयोजित परिषदेत अधोरेखित केली. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष्य अधिनियम...

June 30, 2024 6:40 PM

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची निवड

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालच्या परिवर्तन पॅनेलनं सर्व १४ च्या १४ जागा जिंकल्या. कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्कें, उपाध्यक्षपदी स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे, तर कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड निवडून आले. 

June 30, 2024 6:33 PM

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं हृदयविकारानं निधन

नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. निवृत्तीनंतर त्यांनी ब्लॉगद्वारे वेगवेगळ्या प्रश्नावर मतं मांडली. वेगवेगळ्या वृत्तपत्रातूनही ते स्तंभलेखन करत होते. कमला...

June 30, 2024 7:14 PM

माजी फूटबॉलपटू भूपिंदर सिंग रावत यांचं निधन

भारतीय फूटबॉलपटू भूपिंदर सिंग रावत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. देशांतर्गत फूटबॉल सामन्यांमध्ये ते दिल्ली गॅरिसन, गोरखा ब्रिगेड, मफतलाल यासारख्या संघांमधून खेळले होते.  १९६९मध्ये मलेशियातल्या मेरडेका सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या  भारतीय फूटबॉल संघातही ते होते. अनेक स...

June 30, 2024 6:23 PM

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींना पुढाकार घ्यावा – मुख्य सचिव नितीन करीर

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींना पुढाकार घेण्याचं आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज केलं. गिरीभ्रमणकार अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिकमध्ये आयोजित सह्याद्री मित्र संमेलनात ते बोलत होते. यावेळी सातारा इथल्या प्रियांका मोहिते यांना सह्याद्री युवा रत्न तर पुण्यातल्या आ...

June 30, 2024 7:25 PM

सुजाता सौनिक राज्याच्या नव्या मुख्य सचिव

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्...