July 1, 2024 1:26 PM

यूजीसी नेट परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्याचा निर्णय

राष्ट्रीय परिक्षा संस्थेनं यूजीसी नेट परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.  

July 1, 2024 1:23 PM

नवीन फौजदारी कायदे देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू झाले. केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत नियमित बैठका घेतल्या होत्या. या नवीन कायद्यांमध्ये चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानावर अधिक भर...

July 1, 2024 1:20 PM

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवलं – प्रधानमंत्री

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी ...

July 1, 2024 9:00 AM

विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी नाशिक शहरात केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी काल याठिकाणी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.

July 1, 2024 1:16 PM

ज्ञानोबा – तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कमासाठी काल पुण्यात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या पाटील इस्टेट चौकात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीच...

July 1, 2024 1:14 PM

महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावांची आघाडी

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे १०५ धावांची आघाडी आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर संपुष्टात आला असून, त्यांना फॉलो ऑन मिळाला. स्नेहा राणा हिनं ८ बळी घेऊन इतिहास घडवला, तर दीप्ती शर्म...

June 30, 2024 8:41 PM

क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमावरच्या संदेशातून जडेजानं ही घोषणा केली. फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून जडेजानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं टी २०मध्ये एकूण ७४ सामन्यात ५१५ धावा केल्या असून ...

June 30, 2024 8:34 PM

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल

स्वातंत्र्याच्या अमृत काळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसेच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.   केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयातर्फे 'फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३' या विषयावर आयोजित ए...

June 30, 2024 8:11 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची सीबीआय चौकशी

नीट यूजी परीक्षेतल्या कथित पेपरफुटीप्रकरणी सीबीआयनं आज बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची चौकशी केली. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं इतर गुन्ह्यात अटक केलेल्या तेरा आरोपींची चौकशीही सीबीआनीयनं केली आहे. पेपरफुटीप्रकरणी बिहार आणि झारखंडमधून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

June 30, 2024 8:02 PM

नायजेरिया : बोर्नो राज्यात झालेल्या बाँम्ब हल्ल्यात १८ ठार, चाळीसहून अधिकजण जखमी

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यात काल झालेल्या आत्मघातकी बाँम्ब हल्ल्यात १८ ठार आणि चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.  हल्लेखोरांत एका संशयित महिला हल्लेखोराचा समावेश असून तीने  विवाह समारंभ, रूग्णालये आदी अनेक  ठिकाणांना लक्ष्य केलं असल्याची माहिती, बोर्नो राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संचा...