September 26, 2024 3:36 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं निधन

नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं एका खासगी रुग्णालयात आज निधन झालं. डॉ. चौधरी यांना यकृताशी संबंधित आजार होता.   डॉक्टर चौधरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ...

September 26, 2024 3:33 PM

देशातली ५० हून अधिक औषध दर्जेदार नसल्याचा CDSCOचा अहवाल

देशातली ५० हून अधिक औषध दर्जेदार नसल्याचा अहवाल CDSCO अर्थात केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि विटामिन डी ३ प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे. यामुळं या औषधांच्या सुरक्षेविषयी काळजी निर्माण झाली आहे. विविध कंपन्यांनी ही औषधं तयार केली आहेत.

September 26, 2024 3:10 PM

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू – चंद्रशेखर बावनकुळे

संघटन शक्ती मजबूत करण्याची आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात दिली आहे. या मूलमंत्राचे पालन करुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ...

September 26, 2024 3:18 PM

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली ...

September 26, 2024 6:48 PM

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज किदाम्बी श्रीकांतचा सामना आयुष शेट्टीशी होणार

मकाऊ इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज दुपारी भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना भारताच्याच आयुष शेट्टीशी होणार आहे. तर महिला एकेरीत आज भारताच्या तस्निम मीरचा सामना जपानच्या तोमोका मियाकाझीशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीचा सा...

September 26, 2024 2:37 PM

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये ...

September 26, 2024 2:34 PM

अफस्पाला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा गृह मंत्रालयाचा निर्णय

अरुणाचल प्रदेशातले तीन जिल्हे आणि नामसाई जिल्ह्यातील काही भागांत सशस्त्र बल विशेषाधिकार अधिनियम अर्थात अफस्पाला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून ही मुदतवाढ लागू होईल. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यात तसंच नमसाई जिल्...

September 26, 2024 3:19 PM

खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानी प्रकरणी १५ दिवसांची कोठडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने आज १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातल...

September 26, 2024 2:30 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. कठुवा आणि उधमपूर जिल्ह्यातल्या चार प्रचारसभांना ते संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला जम्मू इथं प्रचारसभा घेणा...

September 26, 2024 2:23 PM

न्यूयॉर्कमध्ये जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी घेतला भाग

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल न्यूयॉर्कमध्ये जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक तीन प्रमुख क्षेत्रांवर त्यांनी ...