July 4, 2024 1:48 PM

पश्चिम रेल्वेने पाच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने पाच विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.यात वांद्रे टर्मिनस ते वीरांगना लक्ष्मीबाई सुपरफास्ट, अहमदाबाद ते आग्रा छावणी, अहमदाबाद ते कानपूर सुपरफास्ट, तसंच अहमदाबाद ते आग्रा छावणी साप्ताहिक या गाड्यांचा समावेश असेल. या गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल कर...

July 4, 2024 1:45 PM

नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं मुंबईत एका विशेष वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम आणि भारतीय साक्ष्य अधिनियम या नुकत्याच लागू झालेल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं पत्र सूचना कार्यालयाने आज मुंबईत एका विशेष वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉ.काकासाहेब डोळे उ...

July 4, 2024 1:42 PM

गाझा पट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशाने हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी सल्लामसलत

गाझा पट्टीत इस्राएलबरोबरचं युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांसोबत सल्लामसलत केल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासचा प्रतिसाद मध्यस्थांमार्फत पोहोचल्याच्या वृत्ताला इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दुजोरा दिला आहे. या प्रतिसादाचा अभ्यास करून इस्राएल निर्णय घेईल, असं त...

July 4, 2024 12:49 PM

महाराष्ट्रात नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु होणार

महाराष्ट्रात  वाचन चळवळीला चालना देण्यासाठी  शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येतील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित क...

July 4, 2024 12:16 PM

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४ हजारांपार

भारतीय शेअर बाजारांनी आज पुन्हा विक्रमी पातळी गाठली. व्यवहाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ११४ अंकांची वाढ नोंदवत ८० हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजारांपार गेले.

July 4, 2024 2:59 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी घेतली चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट

  परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची आज अस्ताना इथं भेट घेतली. सीमाभागातल्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने लष्करी आणि राजनैतिक प्रयत्न करण्याबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. एलएसी अर्थात लाइन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचं पालन करत सीमा भागात शांतता राखणं ...

July 4, 2024 11:45 AM

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाणार

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल, तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान, संत मुक्ताबाईंच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमा...

July 4, 2024 3:17 PM

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीशी संबंधित नियमांमध्ये बदल

संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत खासदारांच्या शपथविधीच्या वेळी घोषणाबाजी झाल्यानंतर सभापती ओम बिरला यांनी त्यासंबंधीच्या नियमात बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेतेवेळी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही.  

July 4, 2024 11:32 AM

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर

महाराष्ट्रात, आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यावर निवडणूक आयोगाचा भर राहील. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांन...

July 4, 2024 2:52 PM

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून आज बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं . केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय ...