July 4, 2024 7:35 PM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८० हजाराच्या उच्चांकी पातळीवर बंद

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदाच ८० हजाराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. कालच सेन्सेक्सनं ही पातळी ओलांडली होती, मात्र दिवसअखेर तो या पातळीखाली बंद झाला होता. आज दिवसअखेर ६३ अंकांची वाढ नोंदवत तो ८० हजार ५० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ...

July 4, 2024 7:33 PM

नीती आयोगाचं संपूर्णता अभियानात राज्यातल्या २७ तालुक्यांचा समावेश

महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधल्या, एकूण २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.   यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन कर...

July 4, 2024 7:26 PM

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं मिळणार – मंत्री अतुल सावे

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.     बेस...

July 4, 2024 7:23 PM

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनात कपात

आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेेनं आज एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.    विधानपरिषदेतल्...

July 4, 2024 7:18 PM

बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान १ लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधीची उभारणी – मंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.    मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात नव्यानं इमारती बांधून त्यात वाढी...

July 4, 2024 3:28 PM

प्रत्येक एसटी आगारात ‘प्रवासी राजा दिन’चं आयोजन

प्रवाशांच्या समस्या तसंच तक्रारी वजा सूचना यांचं स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण व्हावं म्हणून एस टीच्या प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे जिल्हा प्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ...

July 4, 2024 3:15 PM

‘खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज’

खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत रोखे अपीलीय न्यायाधिकरणाच्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन केल्यानंतर दूरदर्शनशी बोलत होते. प्रत्यक्षातल्या तसंच आभासी मा...

July 4, 2024 3:10 PM

राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली पदं ही तांत्रिक आहेत. एकीकडे ही तात्पुरती भरती ११ महिन्यांसाठी करत असतानाच दुसरीकडे ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे, उर्वरित पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वि...

July 4, 2024 2:43 PM

views 1

राज्यसभेचं कामकाज संस्थगित

मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्द्ल आभार प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर देताना “मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व संबंधि...

July 4, 2024 5:06 PM

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ

नीती आयोग ४ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान संपूर्णता अभियान राबवणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार ...