July 5, 2024 9:35 AM
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची, काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडीयमपर्यंत खुल्या बसमधून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले चाहते हातात तिरं...