July 5, 2024 7:46 PM

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं – काँग्रेस नेते नाना पटोले

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं तोवर सध्या ऐन पावसाळ्यात फेरिवाल्यांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा के...

July 5, 2024 7:42 PM

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नीट-पीजी प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नीट - पी जी प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा महामंडळानं आज जाहीर केलं. त्यानुसार नीट - पी जी प्रवेश परीक्षा २०२४ ही आता ११ ऑगस्ट या दिवशी दोन सत्रात घेतली जाणार आहे. ही परीक्षा गेल्या महिन्यात, परीक्षेच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आली होती. 

July 5, 2024 7:38 PM

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असून दोन महिन्यात समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं त्यांनी सांगि...

July 5, 2024 7:35 PM

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.   भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खो...

July 5, 2024 7:31 PM

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधानभवनात सत्कार

टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला राज्य सरकारनं ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.     आजच्या सत्कारमूर्तींमध्ये संघ...

July 5, 2024 7:23 PM

स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पाचा वापर केला – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरची चर्चा आज सुरु झाली. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पाचा वापर केला आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. राज्याची आर्थिक स्थिती ,उत्पन्न आणि तूट यांचा ताळमेळ न राखता या अर्थसंकल...

July 5, 2024 7:19 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबीयांच्या घेतली भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हाथरस दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यातले बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळावं, अशी मागणी गांधी यांनी राज्यसरकारकडे केली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने आपला अ...

July 5, 2024 3:45 PM

आषाढीनिमित्त नाशिकमध्ये सायकल वारी

आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या सायकलिस्ट फाऊंडेशननं आयोजित केलेल्या सायकल वारीचा आज प्रारंभ झाला. या सायकल वारीत ३०० सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात ४० महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वारीत एका पायानं सायकल चालवणारा  एक दिव्यांग वारकरी देखील सहभागी झाला आहे.

July 5, 2024 3:32 PM

गडचिरोलीत नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या ३ तालुक्यांमधे नीती आयोगाचे संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. आज त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेत झालं याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात...

July 5, 2024 3:25 PM

विधानसभेत महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर

स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) आणि शिक्षक पात्रता चाचणी (TET), यासह शास...