July 6, 2024 9:23 AM

पेन्शन तक्रार निवारण मोहिमेत पहिल्याच आठवड्यात 1 हजाराहून अधिक प्रकरणांच निवारण

कौटुंबिक पेन्शनच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात एक हजाराहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या कौटुंबिक पेन्शनधारकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने 1 जुलैपासून महिनाभराची कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्र...

July 6, 2024 9:13 AM

स्पर्धा परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर

स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक महाराष्ट्र विधानसभेत काल मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ...

July 5, 2024 8:36 PM

प्रधानमंत्री ऋषी सुनक यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीत झालेल्या पराजयाची जबाबदारी घेत सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.   प्रधानमंत्री पदाचा ...

July 5, 2024 8:24 PM

सिंधुदुर्गमधील कुडाळ तालु्क्यात पारंपरिक बियाणांची बँक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावातील  शेतकरी सूर्यकांत कुंभार यांनी पारंपरिक बियाणांची बँक तयार केली आहे.  गेल्यावर्षी पासून सुरू झालेल्या या बँकेत भाताची ३० प्रकारची विविध वाणं, भाजीपाला,फळभाज्या,कडधान्य अशी बियाणे आहेत. या बँकेतून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीची एक किलो पारंपरि...

July 5, 2024 8:22 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या दोन दिवसांच्या केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या सकाळी तिरुअनंतपुरम इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या १२ व्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सुवर्णपदकं प्रदान करणार आहेत. या पदवीदान समार...

July 5, 2024 8:18 PM

फॅटी लिव्हर आजाराची चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज – मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

फॅटी लिव्हर या यकृताच्या आजाराच्या विविध स्तरांचं सहज निदान करता यावं यासाठी सोपी आणि परवडणाऱ्या दराची निदान चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत, यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेत यकृताचे आजार टाळण्यासाठी...

July 5, 2024 8:13 PM

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ५३ अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ५३ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार ९९६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २२ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ३२४ अंकांवर बंद झाला.

July 5, 2024 8:03 PM

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचं अनुदान देण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हे दर येत्या १ जुलै पासून लागू आहेत. याच बैठकीत दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुप...

July 5, 2024 8:39 PM

२०२३-२४ या वर्षात देशात संरक्षण सामुग्रीचं विक्रमी उत्पादन

देशात २०२३-२४ या वर्षांत संरक्षण सामुग्रीचं विक्रमी मूल्याचं उत्पादन झालं. २०२३-२४ या वर्षांत उत्पादन मूल्य सुमारे एक लाख २६ हजार ८८७ कोटी रुपयांपर्यंत होतं. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १६ पूर्णांक ८ शतांश टक्क्यांहून अधिक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेक इन इंडिया कार्यक्र...

July 5, 2024 7:49 PM

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्...