July 7, 2024 1:45 PM

इस्रायल हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू ,अधिक जण जखमी

इस्रायलनं काल गाझा पट्टीतल्या एका शाळेच्या इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये हजारो विस्थापित लोक राहत होते, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तर या शाळेच्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याचं इस्रायलच्या संरक्...

July 7, 2024 7:45 PM

जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं दहशतवादी चकमकीत दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा  दहशतवादी ठार झाले तर दोन जवानांना वीरमरण आलं. या दोघांपैकी एक जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे. कुलगाम मध्ये चिन्नीगाम आणि मोडेरगाम इथं दहशतवादी लपून बसल्याची खबर कळताच सुरक्...

July 7, 2024 12:58 PM

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलैला लोकसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री न...

July 6, 2024 1:08 PM

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य

  ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटीश खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा या विषयांसाठीच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लिसा या उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील विगनमधून प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आल्या आहेत. लिसा या कोलकात्याचे शिक्षण तज्ञ द...

July 6, 2024 8:30 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं पेजस्कियान यांचं अभिनंदन

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुधारणावादी नेते आणि माजी आरोग्यमंत्री मसूद पेजस्कियान विजयी झाले आहेत. त्यांनी इस्लामी मूलतत्त्ववादी सईद जलीली यांचा पराभव केला. काल दुसऱ्या फेरीत झालेल्या मतदानात एकूण तीन कोटी मतांपैकी पेजस्कियान यांना १ कोटी ६३ लाख मतं पडली. इराणची निवडणूक २०२५...

July 6, 2024 8:32 PM

ब्रिटनचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कीर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देश नागरिकांची प्रगती, समृद्धी आणि वैश्विक कल्याणासाठी व्यापक धोरणात्मक भागीदारी आणि मजबूत भारत-ब्रिटन आर्थिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी वचनबद्ध आहेत, अस...

July 6, 2024 8:01 PM

पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर साखर, मीठ आणि मेदाच्या प्रमाणाची माहिती ठळक आणि मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावाला FSSAI ची मान्यता

पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर त्या पदार्थांमधली एकूण साखर, मीठ आणि मेदाच्या प्रमाणाची माहिती ठळक आणि मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावाला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं मान्यता दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज ही माहिती दिली. ग्राहकांना ते वापरत असलेल्या उत्पादनाचं पौष्...

July 6, 2024 7:46 PM

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे-मंत्री नितीन गडकरी

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरा...

July 6, 2024 7:39 PM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत...

July 6, 2024 7:34 PM

आरोग्याची वारी- पंढरीच्या वारी या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८१३ वारकऱ्यांना मिळाली मोफत आरोग्य सेवा

आरोग्याची वारी- पंढरीच्या वारी या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८१३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य विषयक सेवा सुविधा आणि आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. एकूण ४ आरोग्य पथकं सुसज्ज रुग्णवाहिकेसह पालखीसोबत आहेत. पालखी मार्गावर ...