July 8, 2024 6:58 PM

राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला.  कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शहरात आज दुपारी पावसानं विश्रान्ती घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. राजाराम बंधारा ३० फुटांवर असून नदीची इशारा पातळी ३९ आहे. जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली ...

July 8, 2024 6:43 PM

मुंबईत गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस

मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली. सांताक्रुझ वेधशाळेत नोंद झालेला गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार आज सकाळी साडे ८ पर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २६७ मिलिमीटर पाऊस ...

July 8, 2024 6:53 PM

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. बैठकीला मदत आणि पुनर्वसन म...

July 8, 2024 7:14 PM

नीट युजी पेपर फुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश

पेपर फुटीची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असेल तरच फेरपरीक्षेचा विचार केला जाईल, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. नीट युजी पेपर फुटीच्या प्रकरणासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासा...

July 8, 2024 6:16 PM

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

मुंबईत मद्यपान करून वाहन चालवण्याची प्रकरणं थांबवण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची ठिकाणी आणि नाक्यानाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणारे पब्ज आणि बारवरही कारवाया कराव्यात, अशी सूचना मुंबई म...

July 8, 2024 5:55 PM

पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं – नाना पटोले

मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पाणी तुडुंब भरलं असून पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपयशाचं खापर पावसावर फोडू नये असंही ते म्हणाले. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाणं अत्यंत गंभीर आहे,...

July 8, 2024 5:52 PM

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून तब्बल १४ तासानंतर मुंबई - गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत झाली. काल या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ चं एक पथक आज सकाळी कुडाळमध्ये दाखल झालं आहे.  दरम्यान, खासदार नाराय...

July 8, 2024 5:47 PM

मुंबई महापालिका आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईसह राज्यातली पावसाची स्थिती पाहता नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सर्व यंत्रणा २४ तास दक्ष असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत हो...

July 8, 2024 4:48 PM

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल १४ जुलैपासून सुरू

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून म्हणजेच १४ जुलैपासून सुरू होणार आहे. सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची नियुक्ती आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून उद्घाटनाचं प्रतीक म्हणून या नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला रविवारी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देण्यात येणार आहे.

July 8, 2024 4:39 PM

ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम ठाणे महापालिकेच्या शुद्धीकरण केंद्रांच्या कामावर होऊन ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिसे आणि शहाड इथल्या शुद्धीकरण केंद्रांजवळच्या नदी पात्रात जमा झालेला गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ९, १० आणि ११ जुलै रोजी...