July 10, 2024 7:53 PM

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीट ची परीक्षा योग्य – बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीटची परीक्षा योग्य असल्याचं बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. ते आकाशवाणीशी बोलत  होते. जे ई इ प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर नीट ची परीक्षा अधिक काटेकोरपणे व्हावी आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा घडवून...

July 10, 2024 7:49 PM

उडदाचे भाव उतरवण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना यश

उडदाचे भाव उतरवण्यासाठी सरकारनं सातत्यानं केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे. इंदूरच्या बाजारपेठेत  तीन पूर्णांक १२ टक्के तर दिल्लीच्या बाजारपेठेत एक पूर्णांक ८ टक्के इतकी घसरण झाली. यंदा तब्बल पाच लाख सदतीस हजार लाख हेक्टर्स इतक्या शेतीक्षेत्रावर उडदाचं पीक घेण्यात आलं. पर्जन्यमान चांगलं राहील तर यंदा...

July 10, 2024 7:44 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फूटबॉल स्पर्धेच्या विजयचिन्हांचं अनावरण

राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या फूटबॉल स्पर्धेच्या विजयचिन्हांचं अनावरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात ड्युरँड चषक, राष्ट्रपती चषक आणि सिमला चषक स्पर्धांच्या विजयचिन्हांचा समावेश आहे. ड्युरँड चषक सामन्यांमधे भाग घेणाऱ्य...

July 10, 2024 7:20 PM

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश कदम यांना कर्तव्यावर असताना वीरमरण

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश विठ्ठलराव कदम यांना काल हरयाणा इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. ते ४२ वर्षांचे होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  कदम यांचा पार्थिव देह आज रात...

July 11, 2024 8:52 AM

झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वीस षटकांच्या पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना काल भारतानं 23 धावांनी जिंकला. आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 182 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल यजमान संघाचा डाव 159 धावांत संपुष्टात ...

July 10, 2024 7:12 PM

सत्ताधारी व उपसभापती यांनी संगमताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

सरकारनं स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता उपसभापतींशी संगनमत करून विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याचा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या मुद्द्यावर चर्चा न करता कामकाज चालू न देणं ही भूमिका चुकीची आहे. सरकारने दोन्ही घटकांशी चर्चा करायल...

July 10, 2024 7:07 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ, गोंधळातच पुरवणी मागण्या मंजूर

विधिमंडळ अधिवेशनात आजच्या दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घोषणाबाजीतच दोन्ही सभागृहांमध्ये पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित न झाल्या...

July 10, 2024 6:58 PM

घटस्फोटित मुस्लिम महिलांना पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

घटस्फोटित मुस्लिम महिलांना पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. घटस्फोटाची याचिका न्यायप्रविष्ट असताना फौजदारी कारवाई संहितेच्या कलम १२५ नुसार आणि घटस्फोट झाल्यानंतर विवाह हक्क संरक्षण कायद्यानुसार मुस्लिम महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म...

July 10, 2024 6:56 PM

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज हा शासन निर्णय जारी झाला असून, यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ही वाढ मिळणार आहे. या निर्णयाचं राज्य राजपत्रित अधिकारी-कर्मचारी महासंघानं स्वागत केलं आहे.

July 10, 2024 6:53 PM

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार

कोकणातील नैसर्गिक उत्पादनांच्या आधारे इथलं उद्योग वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची माझी तयारी आहे. या उद्योगांबरोबरच रिफायनरीसारखे उद्योगही इथं यायला हवेत, असं प्रतिपादन रत्नागिरी-सिंधदुर्गचे  खासदार नारायण राणे यांनी केलं. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा नागरी सत्कार आज रत्ना...