July 11, 2024 11:46 AM

बद्रिनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित

बद्रिनाथ यात्रा काल सलग दुसऱ्या दिवशी विस्कळित झाली. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर चामोली जिल्ह्यातील दोन ठिकाणी दरडींमुळे हा महामार्ग बंद झाला असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. पाताळगंगा बोगद्याच्या जवळ आणि जोशीमठाजवळ काल मोठ्या दरडी कोसळल्या. त्यामुळे यात्रा थांबवण्यात आली. पुढचे काही ...

July 11, 2024 2:55 PM

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देशातल्या नामांकित अर्थतज्ज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ज्ञांशी संवाद साधत आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते या अर्थज्ज्ञांची मतं आणि सूचना जाणून घेत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्यही या बैठकीत उपस्थित आहेत. संसदेचं अर्थसंकल्...

July 11, 2024 11:25 AM

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी महिनाभरात कार्यादेश-उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंबंधी ...

July 11, 2024 2:53 PM

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते आज संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.    

July 11, 2024 9:13 AM

13 जुलै दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार

रायगड जिल्ह्यातल्या कोलाडजवळच्या पुई इथल्या नवीन पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं आजपासून 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळात मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान वरंध घाटदेखील 31 ऑगस्टपर्...

July 11, 2024 3:14 PM

पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षितता यांच्याद्वारे शाश्वत विकास धोरणांसाठी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

पंधराव्या कृषी नेतृत्व समिती २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल नवी दिल्लीत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ ला...

July 11, 2024 8:54 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हजार कोटींहून अधिक विमा रक्कम मंजूर

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाई म्हणून 7 हजार 149 कोटी 28 लाख रुपये विमा रक्क्म मंजूर झालेली आहे. त्यातून 3 हजार 965 कोटी 31 लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून उर्वरित रक्कम वितरणाचं काम सुरू असल्याचं पुणे कृषी...

July 10, 2024 8:05 PM

राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारसाठी नामांकन भरण्याच्या प्रक्रियेला १५ जुलैपासून सुरुवात

देशातील दूध व्यवसाय आणि दुग्धजन्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दिले जातात. यंदा या पुरस्कारांसाठी नामांकन भरण्याच्या प्रक्रियेला १५ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज नॅशनल अॅवॉर्ड पोर्टलवर भरायचे असून, अर्ज भरण्याची अंतीम तारीख ३१...

July 11, 2024 11:39 AM

प्रधानमंत्र्यांची व्हिएन्नात ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांच्याशी चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांच्याशी काल व्हिएन्नामध्ये चर्चा केली. गुंतवणूक आणि व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पर्यावरण आणि हवामान बदल, सांस्कृतिक सहकार्य यांच्यासह द्विपक्षीय संबंधांबाबतच्या विविध मुद्द्य...

July 10, 2024 8:00 PM

उत्तरप्रदेशातल्या पूरग्रस्त भागात शेतजमिनीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार जमिनीचे पट्टे देणार

उत्तरप्रदेशातल्या पिलिभीत आणि लखीमपूर खेरी जिल्ह्यात पुरामुळे शेतजमिनीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार जमिनीचे पट्टे देणार आहे. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पिलिभीत आणि लखीमपूर खेरी जिल्ह्यात सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. नद्य...