September 19, 2024 7:49 PM

राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभरात आंदोलन केलं. मुंबईत मीरा भाईंदर इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या उपस्थिती...

September 19, 2024 7:38 PM

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे आदेश कृ...

September 19, 2024 7:26 PM

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी पातळीला स्पर्श

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आज देशातल्या शेअर बाजारातल्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्सनं आज सकाळच्या सत्रात ८३ हजार ७७४ आणि निफ्टीनं २५ हजार ६१२ या पातळीला स्पर्श केला. पण त्यानंतर दोन्ही शेअर बाजारात घसरण सुरू झाली. दिवसअखेर सेन्स...

September 19, 2024 7:23 PM

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या ६ गडी गमावून ३३९ धावा

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत आज चेन्नई इथं सुरु झालेल्या पहिल्या सामन्यात दिवसअखेर भारतानं ६ गडी गमावून ३३९ धावा केल्या. आर आश्विननं आज नाबाद शतक झळकावलं. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता.  मात्र भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्...

September 19, 2024 7:19 PM

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक प्रस्थापित करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२४ परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प...

September 19, 2024 7:09 PM

केंद्र सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन

विद्यमान केंद्र सरकारच्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने विविध मंत्रालयांकडून विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या मुख्य सत्रादरम्यान “सहकार से समृद्धि” या संकल्पने...

September 19, 2024 8:20 PM

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात

मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या  राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत गिरग...

September 19, 2024 6:44 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जिगांव प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केली असून शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलडाणा इथं दिलं.    मुख्यमंत्री महिला स...

September 19, 2024 6:37 PM

आरोग्य अभिमत विद्यापीठाचा १८ वा पदवीदान समारंभ

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज लोणी बु. इथल्या प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आलं. यावेळी ९ स्नातकांना पीएच.डी.पद...

September 19, 2024 6:32 PM

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून मुख्यमंत्र्यांना जागतिक कृषी पुरस्कारानं सन्मानित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून जागतिक कृषी पुरस्कारानं  काल सन्मानित करण्यात आलं. मुंबईत एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान...