July 11, 2024 8:42 PM

फिलिपाइन्समधील सुलतान कुदारात प्रांतात ७.० तीव्रतेचा भूकंप

दक्षिण फिलिपिन्सच्या सुलतान कुदरत प्रांतांत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का  बसला, अशी माहिती फिलिपिन्सच्या भूकंपमापन आणि ज्वालामुखी शास्त्र  संस्थेनं दिली आहे. फिलिपिन्सच्या किनारी भागापासून नैऋत्येला १३३ किलोमीटरवर आणि  भूगर्भाखाली ७२२ किलोमीटरच्या आसपास भ...

July 11, 2024 8:34 PM

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तराई जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तराई जिल्ह्यातल्या श्रावस्ती आणि बलरामपूरमधल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पूरग्रस्तांची चौकशी केली. तर सहारनपूर जिल्ह्यामध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे. गररा आणि खन्नौत नद्यांच्या प्रवाहात २६४ हून अधिकजणं अडकले असून १२ जिल्ह्या...

July 11, 2024 8:31 PM

नवी दिल्लीत बिमस्टेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून सुरू

नवी दिल्लीत आजपासून बिमस्टेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची दुसरी परिषद सुरू झाली आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर असून त्यांनी उपस्थित समपदस्थांचं स्वागत केलं. त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणात बिमस्टेक सहकार्यामध्ये नवीन ऊर्जा, संसाधनं आणि वचनबद्धता वाढवण्यासाठी ही चर्चा उपय...

July 11, 2024 8:29 PM

कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणावर आभासी बैठक

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रण या विषयावर आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आभासी बैठक झाली. माता आणि बालकांच्या  आरोग्यासाठी गर्भधारणेत योग्य  अंतर आणि आरोग्यपूर्ण कालावधी ही या बैठकीची संकल्पना  होती. या कार्यक्रमात नड्डा यांनी कुटुं...

July 11, 2024 8:19 PM

पालघरमध्ये युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या मणिपूर या गावातून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरिया खताचा बेकायदेशीर साठा जप्त केला. काल रात्री छापा टाकून युरियाची साठ पोती जप्त केली. जप्त केलेल्या युरियाचा तपासणी अहवाल आल्यानंतर हा नमुना शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या युरिया खताशी जुळला तर दोषींवर गुन्हा दाख...

July 11, 2024 7:58 PM

भटके विमुक्त समाजाला महीनाभरात दाखले द्या – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भटक्या विमुक्त समाजातल्या नागरिकांना महिन्याभरात दाखल्यांचं वाटप करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात विधानभवनात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्दे...

July 11, 2024 7:55 PM

गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

दोन महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. त्यापैकी प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई हिच्यावर ४० गुन्हे दाखल असून तिच्यावर शासनाने ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. अखिरा संकेर पुडो उर्फ रत्नमाला या दुसऱ्या नक्षलवादी महिलेवर सात गुन्हे दाखल असून पोलिसांनी तिच्यावर आठ लाखांचं बक्ष...

July 11, 2024 7:53 PM

कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहिल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  याकाळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काह...

July 11, 2024 7:45 PM

शहीद कामेश कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना शहीद झालेले कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी नांदेडमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी  सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने शहीद कामेश कदम यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली, तर तहसीलदारांनी राज्यशासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं.

July 11, 2024 7:41 PM

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाची  दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्रालयात झालेली  तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असं समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितलं. राज्यभरातल्या विविध शेतकरी संघटन...