July 14, 2024 12:37 PM

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारणाऱ्या आमदारांवर कारवाईचा काँग्रेसचा इशारा

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्या पक्षातल्या आमदारांवर कारवाईचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.   विधान परिषदेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीपासूनच संबंधितांवर लक्ष होतं, आता त्यांची ओळख पटली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करून पक्षातून...

July 14, 2024 12:09 PM

उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारपासून इटलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. तिथे रेजिओ कॅलाब्रिया इथे होणाऱ्या जी7 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होतील. तसंच, सहभागी राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्ये गोयल सहभागी होतील. ही भेट व्यापार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी...

July 14, 2024 12:19 PM

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे – प्रधानमंत्री

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंत...

July 14, 2024 11:27 AM

देशाच्या सीमावर्ती भागातील गावांमधील स्थलांतर रोखण्यासाठी रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण करणं आवश्यक – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशाच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या गावांमधील स्थलांतर रोखण्यासाठी तिथं रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण करणं आवश्यक असून या भागात आरोग्यसेवा, इंटरनेट पुरविणं आणि तिथल्या पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.   काल त्यांनी नवी दिल्ली इथं व्हायब्रंट ...

July 14, 2024 11:00 AM

देशातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज नागालँड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.   मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य-महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असून आज आणि उद्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि दक्षिण कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर ...

July 14, 2024 12:17 PM

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारताची ३-१ आघाडी

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा २० षटकांचा क्रिकेट सामना आज दुपारी साडेचार वाजता सुरू होईल. भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.   मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तत्पूर्वी, काल खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्य...

July 14, 2024 10:44 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विकास आराखडा हा समाजातील वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार अनेक दशकांपासून, दुर्लक्षित असलेल्यांना प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. काल मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्प...

July 14, 2024 10:47 AM

प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवला जाण्याची सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सूचना

“कायद्याची तत्त्वं सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसतील, तर कायदेशीर शिक्षणात आणि व्यवसायात त्रुटी आहेत” असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. काल लखनौ इथल्या डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात बोलतांना चंद्रचूड यांनी प्र...

July 13, 2024 9:05 PM

६५ कोटी रुपयांचा निधी गोंदिया जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात  वर्ग

गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात  वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवार पासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केला जाणार आहे. गेल्या रब्बी हंगामात ग...

July 13, 2024 8:59 PM

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत.  पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या देहरा आणि नलगढ मतदारसंघात काँग्रेसच्या, तर हमीरपूरमध्ये भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधल्या...