July 14, 2024 7:15 PM

मुंबईसह कोकणात पावसाची संततधार

राज्यात आजही अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई ठाण्यासह उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.  मुंबईत दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक नद्यां...

July 14, 2024 7:05 PM

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या पथकानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ४ किलो २७ ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा आणि १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय नागरिकाकडे खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळल्यानंतर त्याला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक...

July 14, 2024 6:55 PM

आगामी विधानसभेत समाजवादी पार्टी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा लढवणार असल्याची पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांची माहिती

समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढवणार असून ३० ते ३५ जागा लढवण्याचा पक्षाचा विचार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी वार्ताहर परिषदेत दिली. तसंच, धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा विधानसभा मतदार संघावर पार्टीचा दावा राहणार असल्याचंही ते यावेळी ...

July 14, 2024 6:27 PM

परभणी जिल्ह्यात ६ लाखाच्यावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी भरले अर्ज

परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टरसाठी अर्ज भरले आहेत. या योजनेअंतर्गत केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा कवच दिलं जातं. हे अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदत असल्यानं जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्या...

July 14, 2024 6:22 PM

बारामती इथं जन सन्मान’ रॅलीचं आयोजन

जनतेचा विकास आणि गरिबांना सहाय्य हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व जनतेला सांगणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बारामती इथं आयोजित जन सन्मान' रॅलीत ते आज बोलत होते. महाराष्ट्रात आबालवृद्ध किंवा माता भगिनींवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी ...

July 14, 2024 8:15 PM

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवं टर्मिनल आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात भारतातल्या  हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून, ही वाहतूकसेवा जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात बोलताना सांगितलं. पुण्याच्या लोहगाव विमानत...

July 14, 2024 6:14 PM

भारताबाहेर वास्तव्य करणारे अनिवासी भारतीय देशाच्या विकास आणि आधुनिकीकरणाचे अविभाज्य भाग – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

भारताबाहेर वास्तव्य करणारे अनिवासी भारतीय देशाच्या विकास आणि आधुनिकीकरणाचे अविभाज्य भाग असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. रशियात मॉस्को इथं ते भारतीय समुदायाला संबोधित करत होते. रशियानिवासी भारतीयांनी मायदेशाच्या राष्ट्रउभारणीत दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरव केला. रशिया- ...

July 14, 2024 5:59 PM

‘हमारा संविधान हमारा सन्मान’चा स्तरावरील दुसरा कार्यक्रम येत्या मंगळवारी प्रयागराज इथं होणार

केंद्रीय विधि आणि न्याय मंत्रालयाच्या वतीनं 'हमारा संविधान हमारा सन्मान' या उपक्रमाच्या प्रादेशिक स्तरावरील दुसरा कार्यक्रम येत्या १६ जुलै २०२४ रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणार आहे. भारतीय राज्यघटना आणि भारताचा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केल्याच्या घटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ह...

July 14, 2024 5:53 PM

निती आयोगाकडून गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा

देशात माल वाहतुकीसाठी शून्य कार्बन उत्सर्जन ट्रक वाहनांच्या अवलंबित्वाला चालना देण्याच्या उद्देशानं निती आयोगानं गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरामुळे आपल्याला कार्बत उत्सर्जनात घट साध्य करण्याची, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याची आणि ऊर्जा सुरक्...

July 14, 2024 3:36 PM

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय

क्रिकेटमध्ये बर्मिंघम इथं झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातले दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.   पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५६ धावा केल्या. भारताने फ...