July 18, 2024 3:27 PM

कोरोना बाधित जो बायडन यांनी अध्यपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या मागणीला जोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-1९ चा संसर्ग झाल्यानंतर,अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते, तसंच कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी,अध्यक्ष बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचं जाहीर आवाहन केलं ...

July 18, 2024 3:26 PM

विधानसभा निवडणूक : नांदेडमध्ये २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या २५ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या यादीत आपलं नाव नसेल तर ते समाविष्ट करण्यासाठी मतदारांना ९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मतदार या कालावधीत यादीतल्या नावांमध्ये दुरुस्ती, पत्त्यामध्ये ब...

July 18, 2024 3:22 PM

बेलारूस 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार

बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. हे धोरण उद्यापासून लागू होईल आणि या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत चालेल. युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडमच्या सदस्यांसह 35 देशांतील नागरिक व्हिसाशिवाय बेलारूसमध्ये एका वेळी 30 द...

July 18, 2024 3:19 PM

विशाळगडावरी घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं – विजय वडेट्टीवार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडलं. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं, तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरो...

July 18, 2024 3:10 PM

छत्तीसगडमधे नक्षलविरोधी मोहिमेत २ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे दोन जवान शहीद झाले. या परिसरात माओवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु होती. त्यावेळी माओवाद्यांनी आई.ई.डी.चा स्फोट केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जवानांना रुग्णालयात दाखल करण्या...

July 18, 2024 3:05 PM

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या दाम्बुला इथं सुरू

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरू होत आहे. सलामीचा सामना गट ‘अ’ मधल्या नेपाळ आणि संयुक्त अरब अमीराती या संघात होणार आहे. त्यानंतर गतविजेता भारतीय संघाची लढत क्रिकेटमधला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. भारतीय महिला संघाने २०१८ चा अपवाद वगळत...

July 18, 2024 3:00 PM

हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी -भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी

हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी असल्याचं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नकारात्मक राजकीय वातावरण, देशाची सुरक्षा आणि त्याचा परिणाम याकडेही लक्ष वेधलं. लोकसभेतले विरोधी पक...

July 18, 2024 2:53 PM

बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात ईडीचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने बँक घोटाळाप्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपुर या शहरात छापा टाकला. १ हजार ३९२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी ईडीने १५ ठिकाणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात हरियाणामधल्या महेंद्रगडचे आमदार रावदान सिंह यांच्याविरोधात आणि त्यांच्या कुटुं...

July 18, 2024 5:33 PM

गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली नजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत १२ नक्षली ठार झाले. त्यात ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असून, सर्वांची ओळख पटली आहे.   या १२ जणांवर मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडच...

July 18, 2024 2:35 PM

जम्मू-काश्मीरमधल्या डोडा येथे झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जद्दन बटा गावात शोध मोहिमेसाठी उभारलेल्या लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. सुमारे एक तास झालेल्या या चकमकीत जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्...