September 20, 2024 7:31 PM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८४ हजाराच्या वर बंद 

  मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदा ८४ हजार अंकांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर पहिल्यांदा बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं विक्रमी पातळी गाठली. दोन्ही निर्देशांकांत सकाळपासून सुरू झालेली तेजी अखेरपर्यंत वाढत गेली.   दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ३६० अंकांची तेजी नोंदवून ८४ ह...

September 20, 2024 7:12 PM

जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात मठतांडा गावाजवळ आज एक एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर २३ जण जखमी झाले. जालना-वडीगोद्री महामार्गावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हा अपघात झाला. ही बस गेवराईहून जालन्याकडे निघाली असताना, समोरुन येत असलेला ट्रक या बसला धडकला.   त्यात बसचा वाहक आणि तीन प्रव...

September 20, 2024 6:48 PM

तिरुपतीमधल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवण्याचे आदेश

तिरुपतीमधल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा झाली. या प्रकरणाचा तपास करुन सरकार योग्य कारवाई करेल असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले. प्रसादाच्या लाडूंसाठी तय...

September 20, 2024 7:16 PM

भारत- बांगलादेशकसोटी सामन्याच्या दिवसअखेर आज भारताची आघाडी

  भारत आणि बांगलादेश या दोन संघांदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज दिवसअखेर भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद, ८१ धावा झाल्या होत्या. रिषभ पंत आणि शुभमन गिल आज नाबाद राहिल्यानं ...

September 20, 2024 3:59 PM

बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये आठव्या डावात भारताची इराणवर आघाडी 

हंगेरीत बुडापेस्टमध्ये सुरु असलेल्या पंचेचाळिसाव्या बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये आठव्या डावात भारताने इराणवर आघाडी घेतली. महिला संघाला मात्र पोलंडकडून पराभव पत्करावा लागला.   भारताच्या पुरुष संघाने याआधीचा एकही डाव गमावलेला नाही त्यामुळे त्यांची सुवर्णपदकाकडे वाटचाल सुरु आहे. आठव्या डावानंतर भारत, क...

September 20, 2024 4:00 PM

तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर- प्रल्हाद जोशी

तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.   आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्र...

September 20, 2024 6:32 PM

पश्चिम बंगाल : मागण्या मान्य झाल्यामुळे डॉक्टरांचा संप मागे

पश्चिम बंगालमध्ये संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांनी आपत्कालीन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवांमध्ये उद्यापासून काम सुरु करण्याची घोषणा केली आहे. सरकारनं संपावर असणाऱ्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातली पूर परिस्थिती लक्षात घेत हा निर्णय घेतल्याची घोषणा डॉक्टरांच्या संघटनेनं केली ...

September 20, 2024 3:43 PM

भारतीय मजदूर संघाचं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

भारतीय मजदूर संघाने काल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. निवृत्तीवेतन महागाई निर्देशांकाशी जोडलेलं असावं, किमान निवृत्तीवेतन ५००० करावं,जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी.   सामाजिक सुरक्षा कोड लागू करावा, पाच वर्षे झालेल्या उद्योगामधल्या कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन लागू करावं,...

September 20, 2024 3:41 PM

विरोधकांनी राज्याला बदनाम करण्याचे धोरणआखल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे राज्यात विविध प्रकल्पांची सुरुवात आणि पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. मात्र, राज्याला बदनाम करण्याचे धोरण विरोधकांनी आखल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   नागपूर विमानतळावर काल ते वार्ताहरांशी बोलत होते.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्...

September 20, 2024 2:04 PM

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपला

चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यामधल्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात  ३७६ धावा झाल्या. सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३९ धावांवर डाव सुरु केला आणि ३७ धावात भारताचे उरलेले चार फलंदाज बाद झाले. आर. अश्विन यांनं ११३ धावा केल्या.    बांगल...