July 21, 2024 2:23 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरगे यांना शुभेच्छांसाठी समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. काँग्रेस नेते आणि लो...

July 21, 2024 2:17 PM

मणिपूरमधे सुरक्षा कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त

मणिपूरमधे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली. इंफाळ आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमधे हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या शोधमोहिमेदरम्यान राज्यात २९६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ब...

July 21, 2024 2:06 PM

देशभरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

देशभरात आज गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हा दिवस मानवी जीवनात ज्ञान आणि अभ्यासाच्या महत्वाची तसंच आदरणीय गुरूंची आठवण करून देतो. आजचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आणि आध्यात्मिक गुरूंना वं...

July 21, 2024 6:50 PM

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.   लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी संविधान, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबा...

July 21, 2024 8:18 PM

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये दोन तृतियांश मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सदनात हजर असलेल्या २६३ सदस्यांपैकी १८८ सदस्यांनी या ठरावाच्या बाज...

July 21, 2024 1:07 PM

परदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा वेग कायम

परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात ,गुंतवणुकीचा वेग कायम ठेवल्याने या महिन्यात आत्तापर्यंत रोखे आणि कर्जामध्ये 44344 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातल्या डिपॉझिटरीजनी दिलेल्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी 30 हजार 771 कोटी रुपये रोखे आणि 13573 कोटी रुपये कर्जात गुंतवले आहेत. वा...

July 21, 2024 12:59 PM

पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसा...

July 21, 2024 6:46 PM

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून विक्रेत्यांना आतापर्यंत ८,६०० कोटी रुपयांचा निधी वाटप

प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाल्यापासून केंद्रानं विक्रेत्यांना आतापर्यंत आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप केलं असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल दिली. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या पोर्टलचे उद्घ...

July 21, 2024 11:36 AM

मेंदूशी संबंधित चांदीपुरा विषाणूप्रकरणी आरोग्य सेवा महासंचालकांकडून आढावा

आरोग्य सेवा महासंचालनालयांचे संचालक अतुल गोयल यांनी तज्ञांसह चांदीपुरा विषाणू प्रकरणी आणि गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम म्हणजेच मेंदूशी संबंधित आजाराचा काल आढावा घेतला. त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परीस्थितीवर तपशीलवार चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर संक्रामक घटकांमुळ...

July 21, 2024 10:42 AM

नीट परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आणखी तीन आरोपींना सीबीआयकडून अटक

केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आणखी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेच्या दिवशी या दोघा आरोपींच्या उपस्थितीची तांत्रिक पुष...