September 21, 2024 11:39 AM

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे – केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे; सशक्त आणि सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी युवा पिढीचा हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी काल पुण्यात व्यक्त केली. 'माय भारत‌'च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; असंही...

September 21, 2024 11:25 AM

जालना जिल्ह्यात रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात शहापूर गावाजवळ काल झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस आणि ट्रकच्या चालकांसह 3 प्रवाशांचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

September 20, 2024 8:16 PM

NEET UG 2024 प्रश्नपत्रिकांची चोरी प्रकरणी ६आरोपींविरुद्ध दुसरं आरोपपत्र दाखल

NEET UG 2024 प्रश्नपत्रिकांची चोरी आणि पेपरफुटीच्या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध सीबीआयनं पाटणा इथल्या सीबीआय न्यायालयात दुसरं आरोपपत्र दाखल केलं आहे. भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या तरतुदींअंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं.   याव्यतिरिक्त, NEET UG 2024 परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी असलेले शह...

September 20, 2024 8:11 PM

गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचं आवाहन

नवीन फौजदारी कायदे समजून घेऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी गुन्हे रोखण्यावर भर देण्याचं आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज केलं आहे. ते आज ते हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत भारतीय पोलीस सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडमध्ये बोलत होते. तांत्रि...

September 20, 2024 8:02 PM

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागीरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये, तर त्यांनी उद्योजक म्हणून उभं राहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्धा इथं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आकडेवारीनुसार या योजनेचा सर्वाधिक फायद...

September 20, 2024 7:58 PM

मार्च २०२६पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट्य – गृहमंत्री अमित शहा

  झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात भाजपाच्या परिवर्तन यात्रेची सुरवात आज गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भोगनाडीहपासून संथाल परगणा प्रभागापर्यंतच्या या यात्रेनं राज्यातला निवडणूक प्रचार सुरु झाल्याचं गृहमंत्र्यांनी पोलीस लाईन मैदानावरच्या जनसभेला संबोधित करताना सांगितलं.   झारखंडमधे भाजपाची सत्ता आ...

September 20, 2024 7:51 PM

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज पुण्यात जाहीर

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज पुण्यात जाहीर करण्यात आलं. संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या निबचा समावेश असलेलं बोधचिन्ह एका राष्ट्रस्तरीय स्पर्धेद्वारे निवडलं आहे.   हे बोधचिन्ह लोणी काळभोर इथल्या ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी...

September 20, 2024 7:47 PM

अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे आयाेजन

देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. माळीवाडा इथल्या विशाल गणेश मंदिर परिसर ते आंबेडकर चौक परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. नांदेड जिल्ह्यात स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिके...

September 20, 2024 7:43 PM

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आणि युवा नेत्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीही यावेळी काँग्रेसमधे प्रव...

September 20, 2024 7:32 PM

आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजीटल पायभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक- नितीन गडकरी

येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल असून आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजीटल पायभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नागपूरमध्ये श्री विश्व व्याख्यानमालेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.   ‘आयुर्वेद आणि योगविज्ञान ...