July 24, 2024 1:28 PM

आयात शुल्क कमी केल्यानंतर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण सुरूच

सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क अर्थसंकल्पात कमी केल्यानंतर या धातूंच्या दरांमध्ये होणारी घसरण आजही सुरूच आहे. २४ कॅरेट सोनं कालपासून तोळ्यामागे सुमारे ३ हजार ४०० रुपये आणि २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ३ हजार ३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर ६९ हजार रुपयांच्या पलीकडे आणि २२ कॅरेट स...

July 24, 2024 1:08 PM

सर्वोच्च न्यायालयातर्फे २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन

सर्वोच्च न्यायालय २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन करणार आहे. त्यात प्रलंबित खटले मार्गी लावणं, सामंजस्यानं तोडगा काढणं याला प्राधान्य दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचं आयोजन होतंय. सर्वोच्च न्यायालयात खटले प्रलंबित असणाऱ्या याचिकाकर्त्...

July 24, 2024 1:45 PM

ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक सौदी अरेबियामध्ये होणार

पुढच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये ई-स्पोर्ट्स अर्थात ऑनलाइन गेम्ससाठीचं पहिलं ऑलिम्पिक होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४२ व्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. यामुळं डिजिटल क्रांतीसोबत ऑलिम्पिक जोडलेलं राहिल, अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिली आहे.  ई-स्पोर्ट्स आयोग आणि सौ...

July 24, 2024 12:29 PM

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची रवी शंकर प्रसाद यांची टीका

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका भाजपा नेते रवी शंकर प्रसाद यांनी आज केली. नीट परीक्षेचे आयोजन योग्यरित्या झालं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. परीक्षेच्या संदर्भातल्या अनियमितता लक्षात आल्यावर सरकारने तत्काळ सीबीआय चौकशी सुरू केली होती, असं...

July 24, 2024 10:11 AM

2022 चा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर

हिंदी भाषेतर साहित्यिकांनी हिंदी भाषेसाठी दिलेल्या बहूमुल्य योगदानाकरता मध्य प्रदेश राज्य सरकारच्या वतीनं 2022 चा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर झाला आहे. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त भोपाळमध्ये हा पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात येईल. पाच लाख र...

July 24, 2024 10:07 AM

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं असून, शेवटी सत्याचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेला त्रुटीमुक्त संस्था बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नीट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असंही ...

July 24, 2024 3:01 PM

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे

महसूल खात्याच्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांचा संप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर काल मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी कामगारांना संप थांबवण्याचं आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढावा, असे निर्देश दिले. महसूल ...

July 24, 2024 2:58 PM

महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

  महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अ गटातल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ८२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत अवघ्या ९६ धावा करता आल्या. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं ४८ ...

July 24, 2024 8:28 PM

काठमांडूमध्ये खासगी विमानाला झालेल्या अपघातात १८ ठार

नेपाळमधल्या काठमांडू इथल्या विमानतळावर आज सकाळी एका खासगी विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला. यात १८ जणांचा मृत्यू झाला असून वैमानिकासह तीन प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती काठमांडूच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेहकाक यांनी घटनास्थळावर ...

July 23, 2024 8:45 PM

इथियोपिया : भूस्खलानात १५५ जणांचा मृत्यू

इथियोपिया इथं भूस्खलानामुळे झालेल्या मृतांची संख्या १५५ झाली आहे. इथिओपियामधल्या गेझे गोफा जिल्ह्यात काल सकाळी हे भूस्खलन झालं होतं. आतापर्यंत महिला आणि बालकांचे मिळून ५५ मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. इथियोपियामध्ये सध्या पावसाळा सुरू असून...