July 24, 2024 8:26 PM

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल माजी अग्निवीरांना १०% आरक्षण आणि वयोमर्यादा सवलतीसह समाविष्ट करून घेतलं जाणार- BSF DG नितीन अग्रवाल

सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राखीव पोलीस दलासह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात माजी अग्निवीरांना आता समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक नितीन अगरवाल यांनी ही माहिती दिली. माजी अग्निवीर जवानांसाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून त्यांना वयातही सूट देण्...

July 24, 2024 8:29 PM

केंद्र सरकारची महाराष्ट्रात रेल्वेसाठी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद -रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण

केंद्र सरकारनं महाराष्ट्रात रेल्वेसाठी विक्रमी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद केली असून ही रक्कम विशेष पॅकेजइतकीच आहे, असं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी रेल्वे क्षेत्रात केलेल्या तरतुदींबद्दल ते आज दूरस्थ पद्धतीनं आ...

July 24, 2024 8:20 PM

जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा २५ टक्के वाटा – मंत्री राजीव रंजन सिंग

जगात सर्वात जास्त दूध उत्पादन भारतात होत असून जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्के असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत दिली. नीट यूजी परीक्षा रद्द करण्याचा आणि राज्यनिहाय प्रवेश परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याचा कोणताही ...

July 24, 2024 8:09 PM

महिलांच्या आशियाई टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा मलेशियावर ११४ धावांनी विजय

महिलांच्या आशियाई टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांगलादेशानं मलेशियावर ११४ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशाच्या मुर्शिदा खातूननं ५९ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी केली. तर कर्णधार निगर सुलतानानं ३७ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. त्यामुळे निर्धारित २० षटकात बांगलादेशानं २ गड्यांच्या ...

July 24, 2024 7:54 PM

भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार

भाजपाच्या पुण्यात झालेल्या प्रदेश अधिवेशनानंतर आता भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये २, ३ आणि ४ ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार आहेत.   पक्षाच्या मंडल रचनेतल्या सर्व म्हणजे ७७८ मंडलांमध्ये ९, १० आणि ११ ऑगस्ट दरम्यान अधिवेशनं आणि बैठका होतील. भाजपाचे प्रद...

July 24, 2024 7:49 PM

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ७३ अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ७३ अंकांची घसरण झाली आणि तो ८० हजार ४२९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३० अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ४७९ अंकांवर बंद झाला.

July 24, 2024 7:48 PM

कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातल्या कुटुंबांसाठी अधिकच्या नोंदी मिळवण्याचा राज्यसरकारचा निर्णय

कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातल्या कुटुंबांसाठी अधिकच्या नोंदी मिळवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक हैदराबादला पाठवल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी दिली.   मराठा समाज आरक्षणासंबंधी शंभुराज देस...

July 24, 2024 7:42 PM

चांदोबामागे आज काही वेळासाठी शनी लपणार असल्याची घटना खगोलप्रेमींना पाहायला मिळणार

चांदोबामागेआज काही वेळासाठी शनी लपणार असल्याची घटना खगोलप्रेमींना पाहायला मिळणार आहे. आज रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी चंद्र आणि शनी एकाच रेषेत राहणार आहेत.   साधारणपणे ३० मिनिटांपर्यंत शनीचा हा लपंडाव अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. चंद्राद्वारे शनीला ग्रहण हा एका साखळीचा भ...

July 24, 2024 7:39 PM

आपण कधीही द्वेषभावनेनं राजकारण करत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं स्पष्टीकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं, असं सांगत आपण कधीही द्वेषभावनेनं राजकारण करत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. &nb...

July 24, 2024 7:26 PM

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं – मुख्यमंत्री 

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई इथं दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या हळद संशोधन केंद्राबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.   हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे आगामी ३ वर्षा...