July 25, 2024 7:19 PM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

राज्यात अतिवृष्टीमुळं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी, अशी मागणी विधानसभेतला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत हो...

July 25, 2024 7:26 PM

राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बालत होते. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के, किंवा किमान ...

July 25, 2024 3:24 PM

विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार – राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार असून त्यादृष्टीनं येत्या १ ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली.

July 25, 2024 3:20 PM

भाजपा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचं काम करतंय – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपाचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचं काम करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना केली. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या काही ऑडिओ, व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई करावी, निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्...

July 25, 2024 3:14 PM

मराठा आरक्षण दिल्याचा विसर पडल्याची शेलारांची जरागेंवर टीका

मराठा समाजाचं आरक्षण ज्यांच्यामुळे रद्द झालं, त्यांच्या विरोधात मनोज जरांगे बोलत नसून ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधात बोलतात, अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षानं आरक्षण दिलं, याचा जरांगे यांना विसर पड...

July 25, 2024 3:48 PM

अभिजित गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काल भाजपा सदस्य अभिजित गंगोपाध्याय यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं आज आक्षेप नोंदवला. सकाळी सदनाचं कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस आणि टीएमसीच्या सदस्यांनी गंगोपाध्याय यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत हा मुद्दा उपस्थित केला...

July 25, 2024 3:01 PM

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी राऊज एव्हेन्यू न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तिहार कारागृहातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केजरीवाल यांनी सुनावणीला हजेरी लावली. सर्वोच्च न्यायालयानं १२ जुलै रोजी ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड...

July 25, 2024 2:59 PM

पंचविसाव्या कारगील विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री उद्या कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार

पंचविसाव्या कारगील विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना ते श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी ते दूरस्थ पद्धतीनं शिंकुन-ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही करतील. निमू-पदुम-दारचा मार्गावर स...

July 25, 2024 2:52 PM

ख्यातनाम साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं होतं. आनंदाचे अंतरंग - मदर तेरेसा, ओॲसिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पाऊले, मुला...

July 25, 2024 1:45 PM

ब्रिटनबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेव्हिड लॅमी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ब्रिटनसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर सांगितलं.डेव्हिड लॅमी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लाग...