September 21, 2024 2:28 PM

जपानमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्यानं ३० हजार लोकांना स्थलांतरणाचे निर्देश

जपानमध्ये मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाल्यानं दोन शहरांमधल्या सुमारे ३० हजार लोकांना स्थानिक प्रशासनानं स्थलांतरणाचे निर्देश दिले आहेत. वाजिमा शहरातल्या १८ हजार तर सुझू शहरातल्या १२ हजार जणांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागणार आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या भागातल्या १२ ...

September 21, 2024 2:26 PM

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातमीवर हेजबोल्लानं शिक्कामोर्तब केलं आहे. दाहियेह भागात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १४ जण ठार, तर ६६ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. दाट...

September 21, 2024 2:12 PM

येत्या काही दिवसांत देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा

येत्या काही दिवसांत देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. ओदिशात उद्यापासून मंगळवारपर्यंत तर नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड आणि मेघालयात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व मध्य प्रदेश ...

September 21, 2024 1:36 PM

डिजिटल पेमेंट व्यवहारांचं प्रमाण १९ हजार कोटींपर्यंत गेल्याची अर्थ मंत्रालयाची माहिती

२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशभरात डिजिटल पद्धतीने झालेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाली असून १९ हजार कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत . २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ हजार कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार झाले होते. या कालावधी दरम्यान युपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस च्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये दे...

September 21, 2024 1:23 PM

उत्तर प्रदेशात बस अपघातात ३८ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर खासगी बस दुभाजकाला धडकून उलटल्याने आज झालेल्या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.   सर्व जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये ८० प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी गोंडा इथले रहिवासी आहेत. मद्यध...

September 21, 2024 1:20 PM

जम्मू आणि काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराला वेग

जम्मू आणि काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारानं वेग घेतला आहे. या टप्प्यात येत्या २५ तारखेला ६ जिल्ह्यांमधल्या २६ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुंछ, राजौरी आणि जम्मू इथं ५ प्रचारसभांना संबोधित करणार अस...

September 21, 2024 12:15 PM

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळली

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळून लावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते, रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात बातमीदारांच्या प्रश्नांना नवी दिल्लीत उत्तर देताना सांगितलं की, अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. जयस्वाल म्हणाले की, भारतानं आ...

September 21, 2024 12:22 PM

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावं- राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी मुलींना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती काल संबोधित करताना बोलत होत्या. पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनानं मुली...

September 21, 2024 11:50 AM

आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे. भारतीय समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा यामुळेच संपूर्ण जग आपल्याकडे अपेक्षेनं पाहात आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरमध्ये श्री विश्व व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आगाम...

September 21, 2024 11:43 AM

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे -अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते झालं. कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांनी आपल्या सुरक्षिततेविषयी काळजी घ्यावी. अन्याय सहन न करता त्याविरुद्ध लढण्यास शिकावं आणि यासंदर्भातल्या काय...