July 27, 2024 8:29 PM

पॅरिस ऑलिंपिक : नेमबाज मनू भाकरचा महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मनु भाकरने पात्रता फेरीत ५८० गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं. तर रिदम सांगवानला १५ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात भारताचं आव्हान पात्रता फेरीत संपुष्ट...

July 27, 2024 7:03 PM

संसदेच्या अधिवेशनानंतर जागावाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल – शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागा वाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीन...

July 27, 2024 3:02 PM

जम्मू-काश्मीरमधल्या बेसकॅम्पमधून आज १ हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना

जम्मू-काश्मीरमधल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या बेसकॅम्पमधून आज एक हजार ७७१ यात्रेकरू अमरनाथ गुहेकडे रवाना झाले. यात्रेकरूंना घेऊन जाणारी ६३ वाहने पहाटे पवित्र गुफेच्या दिशेने रवाना झाली. यातले ७७२ यात्रेकरू बाल्ताल मार्गाने तर ९९९ यात्रेकरू पहलगाम मार्गाने पुढचा प्रवास करतील.

July 27, 2024 2:49 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा येत्या २९ तारखेचा मुंबई दौरा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या २९ तारखेला वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन, तसंच महाराष्ट्र विधीमंडळातल्या सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू...

July 27, 2024 2:47 PM

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काल रात्री आपली उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली. यासाठी आवश्यक असणारे अर्ज त्यांनी काल जमा केले. प्रत्येक मत मिळवण्यासाठी आपण कष्ट करू, असं सांगून निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास त्यांनी समाजमाध्यमावरच्या ...

July 27, 2024 2:43 PM

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०२५ अखेरपर्यंत ४० हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०२५ अखेरपर्यंत शासकीय आणि निवासी अशा सुमारे ४० हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त २७० मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे.   या माध्यमातून २० हजार घरगुती आणि कि...

July 27, 2024 1:37 PM

पॅरिस ऑलिंपिकची दिमाखदार सोहळ्यानं सुरूवात

  मुसळधार पाऊस असतानाही पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. देशोदेशीच्या खेळाडूंच्या पथकांनी मैदानात नेहेमीच्या प्रथेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं संचलन केलं. जवळपास सात हजार खेळाडूंनी पॅरिसमधल्या सीन नदीतून बोटीतून येऊन उपस्थितांना अभिवादन केलं. ज्युदोमध्ये तीन वेळा विजेता ...

July 27, 2024 1:26 PM

भारताचा परदेशी चलन साठा ६७१ अब्ज डॉलर्स या उच्चांकी पातळीवर

  रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १९ जुलैला संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात परदेशी चलन गंगाजळीत भर पडल्यानं भारताचा परदेशी चलन साठा ६७१ अब्ज डॉलर्स या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यापूर्वीच्या सलग दोन आठवड्यांमध्ये मिळून परदेशी चलन गंगाजळीत जवळपास १५ अब्ज डॉलर्सनी वाढ झाल...

July 27, 2024 1:25 PM

बेकायदेशीर आदानप्रदान रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष करार

भारतातून अमेरिकेत चोरुन नेलेल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, प्राचीन मुर्ती, पूरातन आणि पारंपरिक वस्तूं संदर्भात भारत आणि अमेरिकेत एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही देशातल्या अवैध व्यापार, निर्यात आयात आणि पूरातत्व वस्तूंच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. भारताचा अमेरिकेबरोबर करण्यात ...

July 27, 2024 1:12 PM

डॉ. एपीजे अबद्ल कलाम यांची आज ९ वी पुण्यतिथी

माजी राष्ट्रपती आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अबद्ल कलाम यांची आज ९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांना देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलाम यांना समाजमाध्यमाद्वारे आंदरांजली वाहिली. कलाम यांचं आयुष्य हा कठोर परिश्रम, साधेपणा आणि संवेदनशीलता यांचा संगम होता, ...