July 30, 2024 9:19 AM

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ही दुर्घटना घडण्या मागची कारणं, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा गोष...

July 29, 2024 8:38 PM

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो विजयी झाल्याची घोषणा राष्ट्रीय निवडणूक परिषदेने केली आहे. मादुरो सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. ८० टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली असून मादुरो यांना ५१ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक परिषदेचे एल्विस अमोरोसो यांनी सांगितलं. एकूण मत...

July 29, 2024 8:35 PM

राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं – मंत्री अश्विनी वैष्णव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन, त्यांना राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. राहुल गांधी लोकसभेच्या सभापतींना सातत्यानं प्रश्न विचारत राहिले त्यांचं हे वर्तन निषेधार्ह असल्याचं संसदीय कामकाज मंत्...

July 29, 2024 8:39 PM

लष्कराच्या चिलखती वाहनांसाठी Advanced Land Navigation System खरेदीसाठी मंजुरी

संरक्षण खरेदी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत लष्कराच्या चिलखती वाहनांसाठी Advanced Land Navigation System खरेदी करायला प्राथमिक मंजुरी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तटरक्षक दलासाठी २२ बोटी खरेदी करायलाही परिषदेनं प्राथमिक मंजुरी दिली.   दरम्यान, संरक...

July 29, 2024 8:14 PM

उडान योजनेअंतर्गत ८५ विमानतळांना जोडणारे ५७९ मार्ग कार्यरत – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

उडान योजनेअंतर्गत सध्या १३ हेलिकॉप्टर तळांसह ८५ विमानतळांना जोडणारे ५७९ मार्ग कार्यरत असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. देशभरात २१ नवे हरित विमानतळ उभारण्याची तत्वतः परवानगी केंद्र सरकारनं दिली असून यापैकी १२ हरित विमानतळ गेल्या १० वर...

July 29, 2024 7:53 PM

मुंबई महानगरपालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने यावर्षी सहा हजार कोटींच्या निविदा काढल्या, मात्र गेल्यावर्षी निविदा काढलेलं एकही काम झालेलं नसून पालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मागच्या वर्षी निविदा काढलेली कि...

July 29, 2024 7:50 PM

मुंबईची जिया राय ठरली जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. जिया हिनं हे ३४ किलोमीटरचं अंतर २८ आणि २९ जुलैदरम्यान १७ तास, २५ मिनिटांमध्ये पार केलं.  

July 29, 2024 7:33 PM

राज्यसरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जागरूक नाही – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

राज्यातलं सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत जागरूक नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. नवी मुंबईत घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दानवे यांनी आज नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात महिलांवरच्या अत्याचारांच...

July 29, 2024 7:30 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुरत्न योजनेतून ३७,००० लाभार्थ्यांना ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात आल्या असून आतापर्यंत चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेमधून जिल्ह्यातल्या ३७ हजार लाभार्थ्यांना ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप करण्यात आलं आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवा...

July 29, 2024 7:21 PM

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स जमीनदोस्त

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स आज जमीनदोस्त करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही रिसॉर्ट्स पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावरून महानगर पालिकेनं ही कारवाई केली.   शिवसेना नेते आणि परिवहन समितीचे माजी अध्यक्ष मिलिंद मोरे हे काल कुटुंबासह ...