September 21, 2024 7:55 PM

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

राज्यातली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पट...

September 21, 2024 7:11 PM

समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

राज्याला ७२० किलोमीटर लांबीचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातले पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेवेळी ते ब...

September 21, 2024 6:59 PM

अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई विद्यापीठाला आदेश

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं विद्यापाठीला दिले आहेत. या निवडणुकीची सर्व तयारी झालेली असताना राज्य सरकारच्या आदेशावरुन काल अचानक विद्यापीठानं ही निवडणूक स्थगित केली होती. त्याला युवासेनेच्या मिलिंद साटम, शशिकांत झोरे आणि प्रदीप सावंत यांनी उच्च न्य...

September 21, 2024 7:15 PM

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरच्या  दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसंच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचं भूमिपूजन केल्...

September 21, 2024 4:02 PM

अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला तुतारी हे नवीन चिन्ह दिलं त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या र...

September 21, 2024 3:34 PM

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची-पालकांची आर्थिक लूट करण्याचा महायुतीचा डाव – विजय वडेट्टीवार

राज्यातल्या खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी तसंच युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून पाच पट शैक्षणिक शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारनं तात्काळ स्थगित करावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री ए...

September 21, 2024 3:25 PM

हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती

हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती झाली आहे. सिंग हे सध्या हवाई दलाचे उप प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येत्या ३० तारखेला सिंग हे विद्यमान एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांच्याकडून हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सिंग यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत विवि...

September 21, 2024 3:02 PM

लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडू मधल्या थुथुकुडी इथं आज ते बोलत होते. पायाभूत सुविधांसा...

September 21, 2024 2:41 PM

भारत आणि ब्राझील यांनी ऊर्जा क्षेत्रातील विद्यमान सहयोग आणि द्विपक्षीय व्यापारातील परस्पर फायदेशीर संबंधांचा घेतला आढावा.

भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य आणि व्यापारातले परस्पर संबंध तसंच, जैवइंधन क्षेत्रातल्या भागीदारीविषयी आज चर्चा झाली. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्री अलेक्झांड्रे सिल्वेरा यांच्या...

September 21, 2024 2:34 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं भाजपाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी ते नाशिक आणि कोल्हापूरला भेट दे...