July 31, 2024 7:00 PM

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवे राज्यपाल

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. मुख्य न्यायाधीश न्यायमुर्ती  मणिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी बागडे यांना राजभवन इथं राज्यपालपदाची शपथ दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेलं नियुक्तीच्या आदेशाचं पत्र मुख्य सचिव सुधांश पंत यांनी वाचून ...

July 31, 2024 6:56 PM

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात आयोजित समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजीत पवार यांनी र...

July 31, 2024 8:40 PM

अर्थसंकल्पात प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक वाढ, रोजगार, कल्याण, भांडवली गुंतवणूक, आणि वित्तीय बळकटीकरण यासारख्या प्राधान्याच्या बाबींमध्ये समतोल साधला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या ब्र...

July 31, 2024 8:40 PM

जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत. जपानने भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत...

July 31, 2024 8:22 PM

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा पुढच्या फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आगेकूच सुरु ठेवली. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं पॅरिस महिला एकेरीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१-५, २१-१० अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी या...

July 31, 2024 6:48 PM

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उप...

July 31, 2024 8:00 PM

केरळमधे वायनाड इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर

केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे. मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून अनेक मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. काही मृतदेह चलियार नदीतून वाहत येत असून ते ...

July 31, 2024 3:41 PM

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती

आयुर्विमा आणि आरोग्य विमा योजनेवरचा जीएसटी रद्द करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेकडून मिळालेल्या निवेदनानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी...

July 31, 2024 3:35 PM

आकाशवाणी मुंबईतर्फे सूर और सावन कार्यक्रमाचं आयोजन

पावसाच्या धारांसोबत सुरांचा आनंद घेण्यासाठी आकाशवाणी मुंबईनं सूर और सावन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. उद्या आकाशवाणी मुंबईच्या चर्चगेट इथल्या सभागृहात संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये पंडित अजय पोहनकर, आणि अंजली पोहनकर यांचं उपशास्त्रीय गायन, पूर्बायन चॅटर्जी यांचं सतारवादन आण...

July 31, 2024 3:29 PM

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला ...