September 22, 2024 9:47 AM

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत...

September 22, 2024 9:35 AM

तरुणांमधल्या तंबाखूच्या व्यसनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्राकडून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी

तरुणांधील तंबाखूच्या व्यसनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील यासंबंधी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयासमवेत संयुक्तरीत्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांन...

September 22, 2024 9:31 AM

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी, पाच कॅबिनेट मंत्र्यांनीही घेतली शपथ

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी काल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आतिशी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत या आपच्या पाच नेत्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी स...

September 21, 2024 8:21 PM

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लसकडून आपल्या व्यासपीठावर विक्रेते आणि सेवाप्रदात्यांच्या व्यवहार शुल्कात ३३ टक्के कपात

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लस अर्थात जेमने आपल्या व्यासपीठावर विक्रेते आणि सेवाप्रदात्यांच्या व्यवहार शुल्कात ३३ टक्के कपात केली आहे.  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही माहिती दिली. यावर्षी ९ ऑगस्टपासून जेमनं नवं महसूल धोरण लागू केलं आहे. यानुसार दहा लाखांपर्यंतच्या मागणीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार ना...

September 21, 2024 8:09 PM

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुमारे ८० टक्के मतदान

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज ७५ ते ८० टक्के मतदान झालं. निवडणूक नियमांच्या उल्लंघनाच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं. टपाली मतांच्या मोजणीपासून मतमोजणीला सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. टपाली मतांचा निकाल आज रात्रीपर्यंत तर अंतिम निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती ...

September 21, 2024 8:06 PM

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला संप कोलकात्यातील आपात्कालीन सेवेतल्या डॉक्टरांकडून मागे

पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील कनिष्ठ डॉक्टर आपत्कालीन सेवेत रुजू झाले आहेत. गेले ४२ दिवस सुरू असलेला संप त्यांनी मागे घेतला. कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ हे कामबंद आंदोलन सुरू होते. मात्र या ड...

September 21, 2024 7:59 PM

क्वाड नेत्यांच्या वार्षिक परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहे. आज डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथं होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. हवामान बदल ते उदयोन्मुख तंत्रज्ञान असे अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत. कर्करोग रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी नाविन्यपू...

September 21, 2024 7:36 PM

देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता

देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे.  धाराशिवमध्ये कळंब तालुक्यात भाटशिरपूरा इथं वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. परतीच्या पावसानं नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये सोयाबीन काढणीच्...

September 21, 2024 7:30 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी पोहरादेवीत येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी पोहरादेवीत येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते बंजारा विरासत या वास्तुसंग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी आज कार्यक्रम स्थळाची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली. या ठिकाणी बंजारा समाज संस्कृती आणि परंपरांचे दर्शन होणार आहे. तसंच दररोज सा...

September 21, 2024 7:56 PM

सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळेच राज्यात उद्योग आले – मुख्यमंत्री

सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्...