August 5, 2024 3:33 PM

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८४ नुसार भविष्य निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन ...

August 5, 2024 3:32 PM

नाशिक जिल्ह्यातल्या अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांच्यात झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी रस्त्यावरच्या अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांच्यात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. नाशिककडून राज्य परिवहन महामंडळाची बस समोरून येणारी बलेनो कार यांच्यात धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात बलेनो कारमधील दोन जणांचा होरपळून जागीच, तर एकाचा उ...

August 5, 2024 3:28 PM

ग्रामीण भागात पतपुरवठ्यामधे वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन

ग्रामीण भागात पतपुरवठ्यामधे वाढ झाली असून २०१४ मधे ७ लाख ३० हजार कोटी पतपुरवठा झाला होता त्या तुलनेत २०२४ मधे २५ लाख ४६ हजार कोटी रुपये पतपुरवठा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली. एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की किसान क्रेडिट कार्डाच्या म...

August 5, 2024 8:22 PM

राज्याच्या विविध भागात पूरसदृश स्थिती/ मुख्यमंत्र्यांनी केली पुण्यातील पुरग्स्त भागाची पाहणी

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं दिलासा दिल्यानं जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळं पुणे शहरात निर्माण झालेली पूरस्थ...

August 5, 2024 8:32 PM

सहारा समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सहारा इंडिया रिअल इस्टेट कंपनी आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये गुंतवणूक केलेल्या 17 हजार 250 गुंतवणूकदारांना आतापर्यंत 138 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्य...

August 5, 2024 2:49 PM

बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षात १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार

बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षात काल १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह ९० जण ठार झाले. तर अनेक जखमी झाले आहेत. आरक्षण विषयक सुधारणा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी काल देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं आहे. देशात चळवळीदरम्यान झालेल्या ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन सरकारनं राजीनाम...

August 5, 2024 7:23 PM

पुण्यात झिका विषाणूचे आणखी ७ नवे रुग्ण

पुण्यात झिका विषाणूचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात नवीन रुग्णांमध्ये कात्रज आणि कोंढवा भागातल्या पाच गर्भवती महिला, एक १८ वर्षीय तरुण आणि एक ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे.  

August 5, 2024 7:40 PM

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातली आत्मनिर्भरता महत्वाची असल्यातं ते म्हणाले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या समाज माध्यमावरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्...

August 5, 2024 7:39 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज फिजी मध्ये नाडी इथं पोहचल्या आहेत. त्या बुधवार पर्यंत फिजीमध्ये असतील. फिजीचे उपप्रधानमंत्री विलियम गावोका आणि फिजीमधले भारताचे उच्चायुक्त पी एस. कार्तिकेयन यांनी राष्ट्रप...

August 5, 2024 8:34 PM

तिन्ही सेनादलांची वित्तीय परिषद संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

देशाच्या तिन्ही सेनादलांची वित्तीय परिषद आज नवी दिल्लीत संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षते खाली होत आहे. संरक्षण दलांसाठीचा वित्तपुरवठा, आणि इतर वित्तविषयक बाबींमधे तिन्ही दलांचा ताळमेळ राखण्यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. या उच्चस्तरीय परिषदेत संरक्षण मंत्रालयातले वरीष्ठ अधिकारी, ...