August 6, 2024 11:34 AM

अमरनाथ यात्रेसाठी आणखी एक तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी १,८७३ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या तळ शिबिरातून काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाली. ६९ वाहनांच्या या ताफ्यात पंधराशे ७९ पुरुष, २०२ महिला, ६५ साधू आणि २७ साध्वीचा समावेश आहे.

August 6, 2024 11:28 AM

आसाममधल्या गुवाहाटीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

आसाममधल्या गुवाहाटीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यानं अचानक आलेल्या पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुवाहाटीमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या पुरामुळे गुवाहाटी महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयं, शिकवणी वर्ग आणि सर्व शैक्षणिक संस्था ...

August 6, 2024 11:43 AM

बीमस्टेकच्या व्यापार परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन

बीमस्टेकच्या व्यापार परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारतासह बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या बीमस्टेकच्या सदस...

August 6, 2024 10:09 AM

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत

आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी, अथ्लेटिक्स, टेबल टेनिस आणि कुस्ती या प्रकारात होणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. हॉकीमध्ये आज भारताचा उपांत्य फेरीतील सामना जर्मनीशी होणार आहे. अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना सकाळी 10 व...

August 6, 2024 1:30 PM

तामिळनाडूमधल्या सुलार इथं ‘तरंग शक्ती 2024’ या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाला आजपासून प्रारंभ

तामिळनाडूमधल्या सुलार इथं 'तरंग शक्ती २०२४' हा पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आजपासून सुरु होत आहे. या सरावात भारताबरॊबर अमेरीका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई आणि सिंगापूर सह एकूण ३० देश सहभागी होत आहेत. हा सराव दोन टप्प्यांत होणार असून आज सुरु झालेला पहिला टप्पा येत्या १४ ऑगस्टपर्यंत तामि...

August 6, 2024 11:44 AM

बांगलादेशाची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केलं जाईल – बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन

बांगलादेशची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी म्हटलं आहे. ढाका इथल्या बंगभवन इथं तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत काल त्यांनी ही माहिती दिली. बांगलादेशमधली सध...

August 6, 2024 10:01 AM

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या अविनाश साबळेची पुरुषांच्या स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अविनाश साबळे याने काल ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र असलेल्या अविनाशनं काल रात्री झालेली ही शर्यत पाचव्या क्रमांकानं पूर्ण करत ८ मिनिट आणि १५ पूर्णांक ४३ सेकंदांची वेळ दिली आणि अंतिम फेरीत ...

August 6, 2024 8:47 AM

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान प...

August 5, 2024 8:27 PM

हिमाचल प्रदेशातील ढगफुटीच्या घटनांमधील बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरूच

हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लू मधल्या नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या घटनांमधील बेपत्ता व्यक्तींचा शोध आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणांहून १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ४० लोक अजूनही बेपत्ता आहेत. याशिवाय, कुल्लू जिल्ह्यातील मलानामधून १५ स्थानिक रहिवाशां...

August 5, 2024 8:02 PM

अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेत मान्य

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या खर्चाशी संबंधित अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेनं आज चर्चेविना मंजूर केल्या. तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या विनियोजन विधेयक २०२४ लाही सभागृहानं मंजुरी दिली. या विधेयकाच्या माध्यमातून २०२४-२५ या...