August 6, 2024 7:20 PM

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा – नाना पटोले

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोडवावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.  आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपानं मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली जात आहे. आरक्षणाचा निर्णय सत्तेत ...

August 6, 2024 7:15 PM

शेअर बाजारात घसरण सुरुच

जपानच्या निक्केई या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम काल भारतीय शेअर बाजारावर झाला होता. आजही संपूर्ण दिवसभरात शेअर बाजारात घसरण सुरू राहिली.  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज १६६ अंकांची घसरण झाली आणि तो ७८ हजार ५९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६३ अंकांची घसरण नों...

August 6, 2024 7:12 PM

बांगलादेशातल्या आंदोलकांकडून मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

बांगलादेशातल्या आंदोलकांनी हंगामी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आंदोलकांनी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केल्याची माहिती आंदोलन समितीचे समन्वयक नाहिद इस्लाम यांनी समाज माध्यमावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून दिली. प्रधानमंत्री ...

August 6, 2024 7:09 PM

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.  बांगलादेशातल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयानं तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्...

August 6, 2024 7:03 PM

बांगलादेशातल्या भारतीय नागरिकांशी सातत्यानं संपर्कात असल्याची केंद्र सरकारतर्फे संसदेत ग्वाही

बांगलादेशात निर्माण झालेलं अस्थिर आणि अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तिथं असलेल्या भारतीय नागरिकांशी केंद्र सरकार राजनैतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दिली. बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत जयशंकर या...

August 6, 2024 7:04 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पात्रता फेरीत ब गटातून पहिल्याच प्रयत्नात त्यानं ८९ पूर्णांक ३४ शतांश मीटर इतका लांब भाला फेकला. या हंगामातली नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  महिलांच्या ५० किलो वजनी गटातल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटनं उपांत...

August 6, 2024 6:09 PM

मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. ...

August 6, 2024 5:59 PM

नोव्हाक ज्योकोविचः ‘गोट’ ते ‘करिअर गोल्डन स्लॅम’

विख्यात टेनिसपटू, २४ वेळा ग्रँडस्लॅम पदकविजेता नोव्हाक ज्योकोविच यानं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस एकेरीचं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच करिअर गोल्डन स्लॅम, अर्थात आपल्या कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि शिवाय ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावणाऱ्या काही मोजक्या टेनिसपटूंच्या यादीत नोव्हाक ...

August 6, 2024 4:05 PM

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या यावेळेपेक्षा दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या २४ जलाशयात मिळून ६१ पूर्णांक ६२ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या पालखेड धरणात ६६ टक्के आणि दारणा धरण समुहात ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे...

August 6, 2024 3:57 PM

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्णांची संख्या ६६ वर

पुणे शहरात झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या ६६वर पोहोचली आहे. यामध्ये २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांचं परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या...