August 7, 2024 6:21 PM

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ९५ टक्क्यापेक्षा जास्त थकित पैसे दिल्याचा सरकारचा दावा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०२३-२४ या हंगामातले ९५ टक्क्यापेक्षा जास्त थकित पैसे दिल्याचा दावा सरकारने केला आहे.  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्य...

August 7, 2024 8:12 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून उद्या त्या राजधानी वेलिंग्टनला भेट देतील. होंगी परंपरा, माओरी स्वागत समारंभ आणि हाका सादरीकरण अशी न्यूझीलंडची समृद्ध परंपरा त्या अनुभवणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू गव्हर्नर जनरल किरो, प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन आदी महत्वाच्या व्यक्तीं...

August 7, 2024 3:54 PM

भाजपा आमदार आशीष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत काँग्रेस नेत्यांना भेटायला जातात, मात्र महाराष्ट्रातले प्रश्न मांडत नाहीत, अशी टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. राज्यातले नेते दिल्लीला गेले तर ठाकरे टीका करतात, पण स्वतः काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात असंही शेलार म्हणाले.

August 7, 2024 3:50 PM

नागपुरात इतवारी बाजारपेठेत अत्तराच्या गोदामाला आग, एकाचा मृत्यू

नागपूर शहरातल्या इतवारी या मुख्य बाजारपेठेत अत्तराच्या गोदामाला लागलेल्या आगीत एका तरुणीचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. दुर्घटनेतल्या जखमींमध्ये एका जोडप्याचा समावेश असून त्यांच...

August 7, 2024 3:45 PM

वायनाडमध्ये दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. सभागृहात शून्य प्रहरादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई वाढवून देण्याचीही मागणी केली. अशा प्रकारच्या आपत्तीचा सामना करू शके...

August 7, 2024 3:37 PM

लोकसभेत २०२४ च्या अर्थ विधेयकावर चर्चा

लोकसभेत आज २०२४साठीच्या अर्थ विधेयकावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संध्याकाळी या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षीच्या अर्थंसंकल्पातली ध्येयं साध्य करण्यासाठी हे अर्थविधेयक मदत करेल, असा विश्वास या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी ...

August 7, 2024 2:50 PM

आयटी क्षेत्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी क्षेत्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतिन प्रसाद यांनी दिली आहे. ते आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते.   सर...

August 7, 2024 1:49 PM

भारतीय शेअऱ बाजारात आज सकाळच्या सत्रात वाढ

भारतीय शेअऱ बाजारात कालच्या पडझडी नंतर आज सकाळच्या सत्रात वाढ पहायला मिळाली. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये ९७३ अंकाची वाढ झाली आणि तो ७९ हजार ५६६ अंकांवर पोहोचला. नंतर दुपारी ५८५ अंकांनी घसरुन ७९ हजारावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीहीतही सकाळच्या सत्रात २२१ अंकांची वाढ होऊन त...

August 7, 2024 1:42 PM

देशाची नवीकरणीय ऊर्जा निर्मितीची क्षमता २०३ गिगावॉटपर्यंत पोहोचली- ऊर्जा मंत्री

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी क्षेत्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतिन प्रसाद यांनी दिली आहे. ते आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते.   सर...

August 7, 2024 1:32 PM

फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू

बांगलादेशातून होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्य सरकारने फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले.   बंदुक, तलवार, काठी, दगड किवा कुठलंही धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात ...