September 22, 2024 2:09 PM

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मराठवाडा इथं पुढचे दोन दिवस तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा इथं मंगळवार ते शुक्रवार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, छत्तीसगड इथं पुढचे चार दिवस तर नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं पुढील सात दिवस मुसळधार ...

September 22, 2024 1:57 PM

बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुल्तानगंज आणि रतनपूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. गंगा आण...

September 22, 2024 1:55 PM

जम्मू काश्मीरमध्ये आरएस पुरा इथं सीमावर्ती भागात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं हाणला

जम्मू काश्मीरमध्ये आरएस पुरा इथं सीमावर्ती भागात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं काल रात्री हाणून पाडला. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारूगोळा जप्त केला. आरएस पुरा इथल्या सीमा भागात काल रात्री दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. गस्तीवरील बीएसएफ जव...

September 22, 2024 1:54 PM

वर्ल्ड फूड इंडिया २०२४ या चार दिवसीय महामेळाव्याचा समारोप

वर्ल्ड फूड इंडिया २०२४ या चार दिवसीय महामेळाव्याचा समारोप आज नवी दिल्ली इथं होत आहे. हा मेळाव्याला १९ सप्टेंबरपासून भारत मंडपम इथं सुरुवात झाली होती. जवळपास ९० देश, २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, १८ केंद्रीय मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम अन्नप्रक्रिय...

September 22, 2024 8:23 PM

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ...

September 22, 2024 3:54 PM

सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा प्राधान्यक्रम – प्रधानमंत्री

मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद - प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे, आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेत डेलावेर इथं झालेल्या क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित क...

September 22, 2024 1:49 PM

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी बायडेन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतल्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भा...

September 22, 2024 8:20 PM

कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर डेलावेर ...

September 22, 2024 3:45 PM

पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

महाराष्ट्रात पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळच...

September 22, 2024 1:41 PM

श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू, अनुरा कुमारा दिसानायके आघाडीवर

श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कडक बंदोबस्तात सुरू आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनपीपी चे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके ४४ टक्के मतं मिळवून आघाडीवर आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा ३० टक्के मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती श्रीलंकेच्या निवडणूक ...