August 9, 2024 7:16 PM

कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला – उपमुख्यमंत्री अजित पवार

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे शेतकरी नाराज झाले, याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे कांदा निर्यातीवर बंदी लादण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने...

August 9, 2024 7:14 PM

जागतिक आदिवासी दिन राज्यात साजरा

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाने नंदुरबार इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी विभाग आश्रमशाळा डिजीटल करण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. हिंगोली शहरातल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक इथं मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पह...

August 9, 2024 6:05 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांना रौप्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकच्या कालच्या दिवशी भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. संपूर्ण देशाला न...

August 9, 2024 5:06 PM

वाहनांसाठी सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांनी चालू आर्थिक वर्षात ६ लाख १४ हजार कोटी रुपायांची उलाढाल

वाहनांसाठी सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांनी चालू आर्थिक वर्षात ६ लाख १४ हजार कोटी रुपायांची उलाढाल नोंदवली. वर्ष २ हजार २३ मध्ये ही आकडेवारी ५ लाख ५९ हजार कोटी रुपये इतकी होती. वाहन उत्पादनात झालेले वाढ आणि विक्रीमध्ये झालेली वृद्धी यामुळे सुट्या भागांची मागणी वाढली आणि त्यातून ही वाढ झाल्याचं ऑटोमोटिव...

August 9, 2024 3:54 PM

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवे...

August 9, 2024 3:41 PM

देशाच्या लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ

देशाच्या खनिज उत्पादनात वाढ झाली असून २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत लोह खनिज उत्पादनात सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. चुनखडीच्या उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ नोंदली गेली. तर चुनखडीचं उत्पादन साडेचारशे मेट्रिक टन झालं होतं. मँगनीज उत्पादन ११ टक्क्यांनी वाढलं आहे.  

August 9, 2024 3:38 PM

राज्यात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

राज्यात अनेक ठिकाणी आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी वारुळाची देखील पूजा केली जाते. सापांविषयी समाजामध्ये पसरलेल्या विविध गैरसमजांबाबत, अनेक सर्पमित्र नागपंचमीच्या निमित्तानं जनजागृती करत असतात. नागपंचमी निमित्त धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ इथं आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सा...

August 9, 2024 3:36 PM

समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांच्या टिप्पणीवर सदनात गदारोळ

राज्यसभेत आज काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलासह सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांच्या टिप्पणीवर सदनात सुरु असलेल्या गदारोळात सभात्याग केला. शून्य प्रहारानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरुद्ध भाजपा ...

August 9, 2024 3:32 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मालदीवच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. हिंद महासागर क्षेत्रात महत्वपूर्ण सामरिक भौगोलिक स्थान असलेला मालदीव हा भारताचा प्रमुख शेजारी देश आहे.  

August 9, 2024 3:31 PM

कोल्हापूरातल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत रंगमंच जळून खाक

कोल्हापूरातल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली. या आगीमुळे जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत नाट्यगृहाचा रंगमंच जळून खाक झाला. नाट्यगृहाचा काही भाग तसंच छतही कोसळलं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. नाट्यगृहाचा बहुतांश भाग लाकडाचा असल्यामुळे आग भरा...