August 10, 2024 1:55 PM

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्रविभागाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगढ, दिल्ली आणि राजस्थानच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यप्रदेशच्या पूर्व भागात तुरळक ...

August 10, 2024 8:36 PM

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन

  ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० आण...

August 10, 2024 1:29 PM

रेल्वेच्या २४ हजार कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार-विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या २४ हजार६५७ कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्रासह ओदिशा, आंध्र प्रदेश,...

August 10, 2024 1:49 PM

सिंहांच्या संवर्धनासाठी आज जागतिक सिंह दिन साजरा

जंगलचा राजा सिंहाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज जागतिक सिंह दिवस साजरा केला जात आहे. सिंहांची घटती संख्या आणि त्यांचं विविध धोक्यांपासून संरक्षण करण्याची तातडीची गरज-याकडे जगाचं लक्ष वेधणे; हा या दिवसाचा उद्देश आहे. भारतात सिंहांच्या संवर्धनाला सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व आ...

August 10, 2024 11:33 AM

डॉ एस जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मूसा जमीर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित केले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, मूसा जमीर यांनी काल मालेमध्ये समुदाय विकास प्रकल्पांचं उद्घाटन करत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. माले इथे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांच्याशी झालेली चर्चा फलदायी झाल्याचं जयशंकर यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात ...

August 10, 2024 2:20 PM

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध आहे-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्‍तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्‍तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही स...

August 10, 2024 4:05 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतची कांस्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत यानं काल पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यानं प्युर्टो रिकोच्या डेरियन क्रूजला १३-५ असं हरवलं. पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे भारताचं सहावं आणि कुस्तीतलं पहिलं पदक आहे. २१ वर्षं आणि २४ दिवस वय असलेला अमन ऑलिम्पिक ...

August 10, 2024 2:30 PM

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून चौदा जणांना सोडण्यात आलं आहे, तर 69 भारतीय नागरिक रशियन सैन्यातून सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती काल परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना...

August 10, 2024 9:55 AM

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला आणि स्वच्छ वनस्पती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला तसंच ग्रामीण भागात 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षातील अंमलबजावणीलाही मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवी...

August 9, 2024 8:21 PM

नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही परीक्षा येत्या रविवारी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेकरता अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरवरची किंवा अतिशय गैरसोयीची केंद्र मिळाली ...