August 11, 2024 10:20 AM

सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना काल पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला.   ऑलिम्पिक ऑर्डर हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ऑलिम्पिकमधील योगदानाची दखल घेत अभिनव...

August 11, 2024 9:58 AM

कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवर १३ ऑगस्टला निर्णय

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, क्रीडा लवादाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. एकसदस्यीय लवाद, डॉ. ॲनाबेले बेनेट, यांना निकाल देण्यासाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विनेश फोगटने लवादाकड...

August 11, 2024 9:47 AM

हिरे आयातविषयक परवान्याची उद्योगमंत्री पियूष गोयल यांची घोषणा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी काल डायमंड इंपरेस्ट लायसन्स म्हणजे हिरे आयातविषयक परवान्याची घोषणा केली. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनात एका मुलाखतीत ते बोलत होते. या परवान्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना लाभ हो...

August 11, 2024 1:33 PM

वक्फ सुधारणा विधेयक २०२४चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ चं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली ‘जेपीसी’ अर्थात, संयुक्त संसदीय समिती, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान, दिली. य...

August 11, 2024 8:55 AM

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी २५ कोटींचा आराखडा

कोल्हापूर इथं आगीत नष्ट झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. हे नाट्यगृह वर्षभरात पुन्हा उभारण्याची ग्वाही देताना त्यांनी त्यासाठी २५ कोटींचा आराखडा केला असल्याचं पाहणीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरी समिती नियुक्त क...

August 11, 2024 1:13 PM

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची कॅबिनेट सचिव म्हणून टी. व्ही. सोमनाथन यांच्या नियुक्तीला मंजुरी

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने  काल  टी. व्ही. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली. सोमनाथन यांची या महिन्याच्या ३० तारखेपासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या तामिळनाडू केडरच्या १९८७च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. सोमन...

August 10, 2024 8:46 PM

किरकोळ क्षेत्रात भारताची लक्षणीय प्रगती

भारताने किरकोळ क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड देशात विविध मोक्याच्या जागांवर पाय रोवत आहेत. परदेशी किरकोळ व्यापाऱ्यांना भारतातल्या संधी खुणावत आहेत. २०२४ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८ शहरात ३ पूर्णांक १ दशांश दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर  देण्यात आला आहे.  गेल...

August 10, 2024 8:42 PM

views 1

महिलांच्या फ्री स्टाईल ७६ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत कुस्तीपटू रितिका हुड्डाचा पराभव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताची कुस्तीपटू रीतिका हूडा हिला ७६ किलो वजनी गटात हार पत्करावी लागली. किर्गिस्तानची अव्वल मानांकित कुस्तीपटू मेडेट कायझी ऎपेरी हिनं रीतिकाचा पराभव केला.  गोल्फमध्येही अदिती अशोक आणि दीक्षा सागर यांना अनुक्रमे ३३ व्या आणि ५१ व्या स्थानावर समाधान मानावं लागल्याने ऑलिम्पिक स्प...

August 10, 2024 8:31 PM

भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही संवा...

August 10, 2024 8:28 PM

जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या  रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी ७ हजार १६० कोटी रुपये खर्च येणार असून, येत्या ४ ते ५ वर्षांत...