September 22, 2024 8:12 PM

इराणमध्ये कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू

इराणच्या पूर्व भागात असलेल्या दक्षिण खोरासन प्रांतात एका कोळशाच्या खाणीत मिथेन गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात किमान ५१ जणांचा मृत्यू झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता घडली. हा स्फोट झाला तेव्हा खाणीच्या दोन भागांमध्ये ६९ कामगार होते. या स्फोटात २० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. दरम्...

September 22, 2024 8:05 PM

परदेशी गुंतवणुकदारांची भारतीय शेअर बाजारात ३३ हजार ६९१ कोटी रुपयांची गुंतवणूक

परदेशी गुंतवणुकदारांनी या महिन्यात भारतीय शेअर बाजारात, आतापर्यंत ३३ हजार ६९१ कोटी रुपये गुंतवले आहेत. मात्र त्याचवेळी ऋणबाजारातून २४५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे त्यांची या महिन्यातली भारतीय भांडवल बाजारातली गुंतवणूक ३१ हजार ४४६ कोटी रुपये इतकी झाली आहे. या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणु...

September 22, 2024 8:00 PM

नॅशनल पीपल्स पॉवरचे अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवरचे अनुरा कुमार दिसनायके विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला आवश्यक असलेली ५० टक्के मतं मिळाली नाहीत. त्यामुळे आघाडीच्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांना वगळून त्यांना मिळालेली दुसऱ्या आ...

September 22, 2024 7:17 PM

जालना जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज पुकारलेल्या जालना जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़.  घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख ...

September 22, 2024 7:13 PM

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत सध्या मुंबईत २४३ दवाखा...

September 22, 2024 7:11 PM

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनाचा कार्यक्रम

वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातून भिक्षु महासंघाचे भंतेजी आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्या...

September 22, 2024 7:22 PM

विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागा वाटपाबाबत आठवडाभरात निर्णय होईल – शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत ह...

September 22, 2024 6:52 PM

राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा कर्करुग्ण बालकांशी संवाद

राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात कर्करुग्ण बालकांशी संवाद साधला. राज्यपालांनी या मुलांना फुलं आणि भेटवस्तू दिल्या. यावेळी मुलांना राजभवनही दाखवण्यात आलं.  कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

September 22, 2024 6:50 PM

मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सिंगापूर इथल्या इन्व्हेस्ट इंडियाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज सिंगापूर इथल्या इन्व्हेस्ट इंडियाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे कार्यालय भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल. तसंच विविध क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या...

September 22, 2024 6:44 PM

‘शिक्षणाची संधी मिळालेल्या समाजघटकांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही’

दीर्घ काळ वंचित राहिल्यानंतर शिक्षणाची संधी मिळालेल्या समाजघटकांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.    शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल झालेत. आधुन...