September 23, 2024 7:17 PM

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला,. तत्पूर्वी आज सकाळी जे. पी. मॉर्गन भारतीय गुंतवणूकदार परिषदेत ते सहभागी झाले होते.

September 23, 2024 1:31 PM

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

हंगेरीत बुडापेस्ट इथं ४५ व्या  बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदकं जिंकणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या क्रीडाक्षेत्रातल्या पराक्रमाचा हा नवा अध्याय असून हे यश इतर बुद्धिबळ पटूंना प्रेरणा देईल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या शुभ...

September 23, 2024 1:22 PM

१२८ इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलानं एका तासात पाच लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला

एका तासात पाच लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज १२८ इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलाचं अभिनंदन केलं. राजस्थानच्या जैसलमेर इथे राबवलेल्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सैन्याने काल सुमारे ५ लाख २० हजार रोपं लावल्याची...

September 23, 2024 2:03 PM

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.   अमेरीका दौऱ्यात न्यूयार्कमध्ये अमेरीकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधान...

September 23, 2024 12:53 PM

केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी मुंबईहून भारत गौरव ट्रेन

केदारनाथ, बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी भारतीय रेल्वे भारत गौरव रेल्वे गाडी सुरू करणार आहे. आयआरसीटीसी आणि उत्तराखंड राज्य पर्यटन महामंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार. ही अकरा दिवसांची यात्रा असून, त्यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रिनाथ या तीर्थक...

September 23, 2024 2:12 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर गेलं आहे. या पथकात  निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश आहे.  निवडणूक आयोगाचं पथक विविध राजकीय पक्षांच्या ...

September 23, 2024 2:13 PM

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार

जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रियासी, राजौरी, पूंछ, श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांमधल्या २६ मतदारसंघांसाठी येत्या बुधवारी २५ सप्टेंबर रोजी मतदान होईल. येत्या ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी ...

September 23, 2024 2:18 PM

श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून अनुरा कुमारा दिस्सानायके यांचा शपथविधी

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे  अनुरा कुमारा दिस्सानायके यांनी आज सकाळी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिस्सानायके यांनी सजिथा प्रेमदासा यांचा पराभव केला.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल दिस्सानायके यांचं  अ...

September 23, 2024 11:41 AM

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज ६ वर्ष पूर्ण

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्य...

September 22, 2024 8:36 PM

नवी मुंबईत कोळी बांधवांनी बांधलेल्या घरांबाबत लवकरच अधिसूचना जारी होणार – मुख्यमंत्री शिंदे

नवी मुंबईत कोळी बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली इथं उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोळी भवनाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ...