August 18, 2024 1:14 PM

उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या सुरक्षेचा घेतला आढावा

उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार यांनी जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांना राज्यातली सुरक्षा व्यवस्था आणि अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी लष्करानं केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. लेफ्टनंट जनरल सुचिंद्र यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगि...

August 18, 2024 1:29 PM

२०३० पर्यंत पाळीव जनावरांना ‘लाळ्या खुरकुत’ आजारापासून मुक्त करण्यासाठीच्या उपायोजनांचा केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी घेतला आढावा

देशातल्या पाळीव जनावरांचं २०३० पर्यंत लसीकरण करून त्यांना तोंड तसंच खुरांना होणाऱ्या ‘लाळ्या खुरकुत’ आजारापासून मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मत्सपालन, पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री राजीव रंजन सिंह यांनी बैठक घेतली. शेतकऱी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पशुधन महत्...

August 18, 2024 3:59 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथल्या एका कार्यक्रमात १८८ हिंदू निर्वासितांना नागरिकत्व सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाही, तर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, असं प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. याशिवाय अमित...

August 18, 2024 12:59 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज कुवेतच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज कुवेतमध्ये दाखल झाले. कुवेतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांनी त्यांचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान, जयशंकर कुवेतच्या राष्ट्रप्रमुखांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात उभय देशातल्या राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा, संस्कृती...

August 18, 2024 12:44 PM

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आज इस्रायलमधील तेल अवीव इथं पोहोचले

गाझामध्ये युद्धविराम घोषित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आज इस्रायलची राजधानी तेल अवीव इथं पोहोचले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आत्तापर्यंत ब्लिंकन यांनी नऊ वेळा पश्चिम आशियाचा दौरा केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात ...

August 18, 2024 12:35 PM

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआय संजय रॉय याची मानसशास्त्रीय चाचणी घेणार

कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग संशयित आरोपी संजय रॉय याची मानसशास्त्रीय चाचणी आज घेणार आहे. दिल्लीच्या केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या विश्लेषकांचं एक पथक कोलकात्याला पोहोचलं असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय अन...

August 18, 2024 12:10 PM

विदर्भातील दूध संकलन पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खुपच कमी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी ५ लाख लिटर असून ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स विज्ञान विद्यापीठ तसंच अकोल्यातली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पशुवैद्यकीय तंत्रज्ञांच्या मदतीनं व...

August 18, 2024 1:15 PM

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला आज ७ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोवस्क- कामशाकी शहरात ४८ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून तीनशे किलोमीटरच्या भागात त्सुनामी येण्याचा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्यानं दिला होता. मात्र नंतर विभागाने ही शक्यता नाकार...

August 18, 2024 11:03 AM

चीनमधील चेंगडू इथं सुरू होणाऱ्या ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी भारताकडून ३९ खेळाडूंचा संघ रवाना

चीनमधील चेंगडू इथं येत्या २० तारखेपासून सुरू होणाऱ्या १५ आणि १७ वर्षांखालील कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्य पद बडमिंटन स्पर्धेसाठी भारतानं ३९ खेळाडूंचा संघ पाठवला आहे. १७ वर्षांखालील गटाचं नेतृत्व श्याम बिंडीगणविले तर १५ वर्षांखालील गातच नेतृत्व तन्वी पत्री करणार आहे. गुवाहाटी मधल्या सराव शिबिरानंतर भ...

August 18, 2024 11:01 AM

मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून साडेचार किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागानं, मुंबईला उतरलेल्या दोन व्यक्तींकडून तस्करी करण्यात येत असलेलं साडेचार किलो सोने जप्त केलं. अबुधाबी ते मुंबई असा प्रवास केलेल्या या दोन व्यक्तींची महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यापैकी, एकाच्या अंगावर घातलेल्या जाकिटाच्या आत चार पाकिटं दडवलेली आढळली. अब...