September 23, 2024 4:11 PM

जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवाशक्तीवर – मंत्री भूपेंद्र यादव

संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवाशक्तीवर आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वनं आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईतल्या नरसी मोनजी शिक्षण संस्थेत विकसित भारतासाठी युवाशक्ती या कार्यक्रमाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. द...

September 23, 2024 7:28 PM

मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार पावसाची हजेरी

राज्यात कालपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. रत्नागिरीत आज  दुपारपासून मळभ होतं मात्र संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली.  सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, मिरज, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जो...

September 23, 2024 3:14 PM

महाराष्ट्रातली जनता आम्हाला साथ देण्याच्या मनःस्थितीत – शरद पवार

राज्यातली जनता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं पत्रकारांशी बोलत होते.  हे ...

September 23, 2024 3:10 PM

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा – आशिष शेलार

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा असं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचं हित जोपासणारे असल्याची टीका त...

September 23, 2024 3:04 PM

अमरावतीत खासगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ ठार, २५ जखमी

अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सेमाडोह परिसरात आज खासगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर २५ जण जखमी झाले. यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही बस अमरावतीहून धारणीच्या दिशेने प्रवास करत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बसमधले अनेक प्रव...

September 23, 2024 2:52 PM

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर

निवडणूक आयोगाचं पथक २६ ते २८ सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार  आहे. २८ सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रम...

September 23, 2024 2:49 PM

घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न

कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकार घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढवणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कांद्याचा पुरेसा साठा असून खरीप हंगामात चांगली पेरणी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला....

September 23, 2024 2:17 PM

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर  जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निव...

September 23, 2024 6:47 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल-खालिद अल-सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी   न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७९ व्या सत्रादरम्यान नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली, कुवेतचे राजपुत्र शेख सबाह खालेद अल हम अल सबाह आणि पॅलेस्टिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी स्वतंत्रपणे विविध विषयांवर...

September 23, 2024 3:50 PM

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उप...