September 23, 2024 8:05 PM

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्यात न्यूयार्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री ...

September 23, 2024 8:06 PM

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखि...

September 23, 2024 8:04 PM

२०२५ मध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व “लापता लेडीज” करणार

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मधे होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल, असं भारतीय चित्रपट महासंघानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

September 23, 2024 7:50 PM

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूच...

September 23, 2024 7:40 PM

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

येत्या १० नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली.  या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशी...

September 23, 2024 7:35 PM

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा...

September 23, 2024 8:41 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती उज्जल भुयान, न्यायमूर्ती अभय ओक, म...

September 23, 2024 7:14 PM

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ९८० अंकांच्या नवा उंचीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर ...

September 23, 2024 7:01 PM

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचं राज्यपालांचं आवाहन

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ मुंबई विद्यापीठात झाला. त्यावेळी ते बोलत होते.     राज्यपालांनी यावेळी उप...

September 23, 2024 7:17 PM

परभणीत धनगर समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन

परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी आज धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगड या जमातीचे राज्यात लोक राहत नसून धनगर या जातीचे लोक राहतात त्यामुळे धनगड ऐवजी धनगर शब्द वापरून धनगर समाजाला केंद्र आणि राज्यात एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पूर्णा, पालम, गंगाखेड, झरी, पाथरी अशा ...