August 26, 2024 8:43 AM

परभणी : चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता

परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार ह...

August 26, 2024 8:38 AM

राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचं आदित्य ठाकरे यांचं आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर असून, काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बरोजगारी, महिला सुरक्षा यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली. आ...

August 26, 2024 9:44 AM

सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

केंद्र सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करायला राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. मार्च २०२४ पासूनच याची अंमलबजावणी होणार अस...

August 26, 2024 1:02 PM

‘देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प आता देशवासियांचा संकल्प’

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल छत्तीसगडमधील नवा रायपूर इथं अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचं दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधल्या अंमली पदार्थांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठ...

August 26, 2024 1:36 PM

न्यूयॉर्कमध्ये आजपासून अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

वर्षातली शेवटची टेनिस ग्रँडस्लॅम यूएस खुली अजिंक्यपद स्पर्धा आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू होणार आहे. भारताचा सुमित नागल आणि रोहन बोपण्णा हे दोघे स्पर्धेत उतरतील. एकाच वर्षात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या एकेरीत खेळणारा सुमीत नागल २०१९ नंतरचा पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू ठरला आहे. सध्या तो जागतिक क्रमव...

August 25, 2024 8:33 PM

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी – प्रधानमंत्री

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जयपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.    न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलल...

August 25, 2024 8:25 PM

लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावर मंत्री चिराग पासवान यांची फेरनिवड

लोक जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावर आज केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पाच वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली. रांची इथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हरयाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं पासवान यांनी सांगितलं.

August 25, 2024 8:23 PM

बांगलादेश : नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस यांनी हंगामी सरकारकडून निवडणुकांचं नियोजन मागवलं

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी हंगामी सरकारकडून शक्य तितक्या लवकर निवडणुका घेण्यासाठी नियोजन मागवलं आहे. प्राध्यापक युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारने अद्याप राजकीय पक्षांशी या संबंधी संवाद साधलेला नसल्याबद्दल मिर्झा यांनी काल ढाका इथं असंतोष व्यक्त ...

August 25, 2024 8:19 PM

‘बांगलादेश अन्सार’ दलाची केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी

बांगलादेशातल्या ‘बांगलादेश अन्सार’ या अर्थसैनिक सहाय्यक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीला घेराव घालून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सचिवालयातले सर्व कर्मचारी इमारतीत अडकून पडले आहेत. ‘बांगलादेश अन्सार’चं राष्ट्रीयीकरण करण्यात यावं या मागणीसाठी कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून आंदो...

August 25, 2024 8:15 PM

इस्रायलवर हिजबुल्लाह संघटनेकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटनेनं आज सकाळी इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांचा लष्करी नेता फौद शुकुर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला असल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. ३० जुलै रोजी बैरुत इथं शुकुर याची हत्या झाली होती. हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे....