August 26, 2024 7:18 PM

शेअर बाजारात तेजी, निफ्टी पुन्हा २५ हजाराच्या वर

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं २५ हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ६१२ अंकांची वाढ  झाली आणि तो ८१ हजार ६९८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी १८७ अंकांची वाढ नोंदवत २५  हजार ११ अंकांवर बंद झाला.

August 26, 2024 9:08 PM

देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह

भगवद्गगीतेतून विश्वाचं ज्ञान दिलेल्या श्रीकृष्णाचा जन्मसोहळा म्हणजेच   गोकुळाष्टमी आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी होत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळीच्या मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज मध्यरात्री हा सोहळा रंगणार आहे. मथुरेसह देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्...

August 26, 2024 7:06 PM

बीड इथं आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषीमहोत्सवाचा आज समारोप झाला. २१ ऑगस्टला सुरु झालेल्या राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाला  मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. या महोत्सवात अत्याधुनिक कृषी अवजारांचे प्रदर्शन, धान्य महोत्सव, स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या ...

August 27, 2024 8:40 AM

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण बसवले जाणार

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत...

August 26, 2024 3:51 PM

कल्याण इथं दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

कल्याण इथं दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी पीडिता आरोपीच्या घरात खेळायला गेलेली असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र यादव याल...

August 26, 2024 3:48 PM

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाच्या कुटुंबाचं आत्मदहनाचा प्रयत्न

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एका सरपंचाच्या  कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी ग्रामपंचायती अंतर्गत केलेल्या कामांची ९६ लाखांची देयकं प्रशासनाने रोखली. याची दाद मागण्यासाठी सरपंच शशिकला मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या अन्य दोघांनी अंगावर डिझेल ओतून जाळून...

August 26, 2024 3:46 PM

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशा सूचना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या तांत्रिक सल्लागारांनी, संबधित विभागाला दिल्या आहेत. मुंबई-गोवा राज्य महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत  खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन ग...

August 27, 2024 8:44 AM

राज्यभरातल्या बाजार समित्यांचा एकदिवसीय बंद मागे

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीनं उद्या पुकारलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबई सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून एका महिन्यात या समितीचा अहवाल घेण्याच्...

August 26, 2024 1:40 PM

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दि...

August 26, 2024 1:28 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांच्याशी संवाद साधला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध आणि सहकार्य, तसंच क्वाडबद्दल यावेळी चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली आहे.