August 28, 2024 1:14 PM

फसवे संदेश आणि कॉल्सचा सामना करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी एकत्रित काम करण्याची गरज – TRAI

अवांछित संदेश आणि फसव्या कॉल्सच्या समस्येचा सामना करण्यासाठी सर्व दूरसंचार कंपन्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असं TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी म्हटलं आहे. फसवे संदेश आणि दिशाभूल करणाऱ्या फोन कॉल्स पासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी TRAI नं...

August 28, 2024 1:49 PM

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी वरिष्ठ आयपीेएस अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती झाली आहे. श्रीनिवासन हे १९९२च्या तुकडीतले बिहार कॅडरचे अधिकारी असून सध्या ते राजगीर इथल्या बिहार पोलीस अकादमीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.  मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने त्यांच्या नेमणुकीवर शिक्...

August 28, 2024 1:00 PM

जय शाह यांची ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी शहा हे एकमेव उमेदवार होते. यावर्षी 1 डिसेंबर रोजी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. 35 वर्षांचे शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण उमेदवार आहेत. ICC चे विद...

August 28, 2024 1:25 PM

वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ साठी मतं आणि सूचना मागवण्यात आल्या

संयुक्त संसदीय समितीने वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वर जनता, एनजीओ, तज्ज्ञ आणि संस्थांकडून मतं आणि सूचना मागवल्या आहेत. लोकसभा सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. लेखी सूचना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत jpcwaqf-Iss@sansad.nic.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्र...

August 28, 2024 10:09 AM

वस्त्रोद्योग क्षेत्रातील चार स्टार्ट-अपना प्रत्येकी पन्नास लाख रुपये

वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.हे चारही स्टार्टअप कंपोझिट, शाश्वत कापड आणि स्मार्ट टेक्सटाइल या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रा...

August 28, 2024 9:57 AM

राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी नवी दिल्लीत चिलीचे कृषीमंत्री एस्टेबान व्हॅलेन्झुएला यांची भेट घेतली

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत चिलीचे कृषी मंत्री एस्टेबान व्हॅलेन्झुएला आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. दोन्ही देशांमधील कृषी सहकार्य, फलोत्पादन कृती आराखडा यासह सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी आणि परस्पर सहकार्याच्या महत्त्वाच्या मुद्यांवर या बैठकी...

August 28, 2024 9:51 AM

भारत आणि ब्राझील यांच्यात हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल नवी दिल्लीत ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माउरो व्हिएरा यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान भारत आणि ब्राझील यांच्यातील हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.याशिव...

August 28, 2024 10:17 AM

देशाच्या कोळसा उत्पादनात यावर्षी ७.१२ टक्के वाढ

देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात या वर्षी आतापर्यंत 7.12 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवल्याचं कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.25 ऑगस्टपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आर्थिक वर्षात देशाचं एकत्रित कोळसा उत्पादन वाढून 370 दशलक्ष टन झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 346 दशलक्ष टन इतकं ह...

August 28, 2024 1:22 PM

पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ

दिव्यांगांसाठीच्या पॅरालिंपिक स्पर्धेला आजपासून पॅरीस इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धा येत्या ८ सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. एकूण २२ क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश असून त्यातल्या १२ खेळांमधे भारताचा ८४ जणांचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पॅरालिंपिक संघ आहे. पॅरा सायकलिंग, पॅरा ज...

August 28, 2024 9:26 AM

एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात आंदोलन

बीड जिल्ह्यात मांजरसुंबा बस स्थानकातून मागील तीन दिवसांपासून एसटी बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन काल बस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहता आलं नाही, विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक आणि आर्थिक ही नु...