September 24, 2024 1:55 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून ५ दिवसांच्या उझ्बेकिस्तान दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून ५ दिवसांच्या उझ्बेकिस्तान च्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यामध्ये उद्या त्या एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९ व्या वार्षिक सभेला  उपस्थित राहणार आहेत. भारत आणि उझ्बेकिस्तान दरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय गुंतवणूक करारावर त्यांच्या उपस्थितीत...

September 24, 2024 1:08 PM

जपानला ५.९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का

जपानला आज सकाळी सव्वा आठ वाजता ५ पूर्णांक ९ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला त्यानंतर टोकियोच्या दक्षिणेकडच्या बेटांवर ५० सेंटीमीटर ऊंचीच्या त्सुनामीच्या लाटा आदळल्या.या भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या इझू बेट साखळीतल्या तोरिशिमाजवळ होता. भूकंपाच्या के...

September 24, 2024 1:01 PM

फलंदाज अजिंक्य रहाणे ईराणी चषक क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबई संघाचा कर्णधार

ईराणी चषक क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबई संघाचा कर्णधार म्हणून फलंदाज अजिंक्य रहाणे याची निवड झाली आहे. त्याच्यासह शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मुशीर खान, शम्स मुलानी आणि तनुश कोटियन हे मुंबईच्या रणजी संघातले खेळाडूही या संघात असतील. येत्या १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

September 24, 2024 1:33 PM

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार काल संध्याकाळी संपला. दुसऱ्या टप्प्यात २६ विधानसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू प्रदेशातल्या रियासी, राजौरी आणि पुंछ तर काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगर आणि बडगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे. या दुसर्‍या टप्प्यात २५ लाख ७...

September 24, 2024 12:50 PM

भारताचा युकी भांबरी आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिवेट्टी चीनमध्ये खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

चीनमधे चेंगडू इथं सुरु असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. उपान्त्य फेरीत त्यांनी इव्हान डोडिग आणि राफेल मातोस या जोडीचा ६-३, ७-६,असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांची लढत दांबिया आणि रेबोल या...

September 24, 2024 11:00 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचा महिला सक्षमीकरणावर भर

तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पहिले 100 दिवस पूर्ण केले आहेत. या काळात, सरकारनं पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. यांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वं...

September 24, 2024 10:37 AM

कोकण, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी लगतच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोकण, कर्नाटक आणि गोवा या सागरी किनारपट्टी लगतच्या राज्यांना आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर उत्तर कर्नाटक,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.   केरळ, आंध्रप्रदेश किनारपट्टी, रायलसीमा, तेलंगण, गुजरात, ओडिशा, अरुणाच...

September 24, 2024 1:46 PM

विधिमंडळांची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

विधानमंडळांची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा, असं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रकुल देशांमधल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या संघटनांचं १० वं संमेलन नवी दिल्लीत भरलं आहे. त्यात ते बोलत होते. विधानमंडळांनी विविध व्यासपीठांवर चर्चा करू...

September 24, 2024 9:56 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतल्या शिखर परिषदे नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आर्मेनिया चे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि वॅटिकन होली सी चे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पियेत्रो पेरोलीन यांच्या बरोबरही चर्चा केली....

September 24, 2024 9:50 AM

भारत आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा आराखडा जगासमोर मांडायला तयार – प्रधानमंत्री

डिजिटल पायाभूत सुविधा अडथळा न होता दोन देशांना जोडणारा सेतू बनवणार असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समिट ऑफ द फ्यूचर या शिखर परिषदेमध्ये बोलत होते. लोकहितासाठी भारत आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा आराखडा जगासमोर मांडायला तयार असल्याचंही त्यांनी याव...