September 24, 2024 8:37 PM

कवच यंत्रणेची चौथी आवृत्ती डिसेंबर २०३० पर्यंत देशभरात लागू करण्याचं उद्दिष्ट

कवच या स्वयंचलित रेल्वे सुरक्षा यंत्रणेची चौथी आवृत्ती डिसेंबर २०३० पर्यंत संपूर्ण देशभरात लागू केली जाईल, असं उद्दिष्ट ठरवल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशात सर्वप्रथम कोटा ते सवाई माधोपूर मार्गावर ही यंत्रणा लावलेली आहे. त्याची पाहणी करण्यापूर्वी ते जयपूरमध्ये वार्ताहरांशी...

September 24, 2024 5:14 PM

लहान मुलांचं अश्लील साहित्य डाउनलोड करणं, पाहणं आणि साठवणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा-सर्वोच्च न्यायालयानं

लहान मुलांचं अश्लील साहित्य डाउनलोड करणं, पाहणं आणि साठवणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी केवळ डाउनलोड करणे आणि पाहणे हा पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नसल्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत, सरन्यायाधीश डॉ.डी.वा...

September 24, 2024 7:24 PM

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी आज संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. भुईबावडा घाटात काल दरड कोसळ...

September 24, 2024 4:58 PM

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ.शरद कळणावत यांचं निधन

यवतमाळ इथले ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ. शरद कळणावत यांचं आज सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. शरद कळणावत यांनी नागपूर आणि अमरावती दोन्ही विद्यापीठांमध्ये कार्यकारी मंडळ आणि विद्वतसभा सदस्य, अधिष्ठाता, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पडल्या. अ...

September 24, 2024 4:53 PM

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं असल्याचं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल देशातल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या पदाधिकाऱ्यांची १० वी परिषद सुरू आहे. यात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासा संदर्भात विधानमंडळाची भूमिकाया विषयावर...

September 24, 2024 2:38 PM

भारतीय शेअर बाजरांमधे सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांचा नवा उच्चांक

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात केलेल्या कर्जावरच्या व्याज दरकपातीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी आज सलग चौथ्या सत्रात नवा विक्रमी उच्चांक गाठला. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ८५ हजाराची प...

September 24, 2024 1:45 PM

केंद्रीय मंत्री अमित शाह उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.

September 24, 2024 1:42 PM

भारताच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी – मंत्री पियूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कालच्या पहिल्या दिवशी अनेक बैठका घेतल्या आणि भागधारकांशी संवाद साधला. बिझनेस कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला गोयल उपस्थित होते. या बैठकीत भारताची मजबूत धोरणं आणि सुधारणांवर चर्चा झाली. भारतीय बाजारपेठेत...

September 24, 2024 1:29 PM

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी

भारतीय वंशाच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी ही घोषणा केली. सुनीता विल्मम्स बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ही जबाबदारी सांभाळणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि कोनोनेन्को यांनी...

September 24, 2024 1:32 PM

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत शेतकऱी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. आपण जवळपास ५० शेतकरी नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मुद्दे जाणून घेतल्याचं चौहान यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी  तिचा आत्मा आहेत, असंही ...